आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक मेगाबजेट चित्रपटांच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. मात्र आता बरेच निर्माते पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत. ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’देखील या यादीत सामील आहे. चित्रपटाच्या सूत्रांनी सांगितले, 15 मेनंतर प्रभास, सैफ अली खान, सनी सिंह, कृती सेनन हैदराबादमध्ये याचे शूटिंग सुरू करू शकतात.
हा चित्रपट मेगा बजेटचा आहे तर याचे शूटिंग शेड्यूलही मोठे आहे. शूटिंग एकूण 150 दिवस होणार. त्यापैकी 60 दिवसाचे शूटिंग आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मुंबईच्या मड आयलँडमध्ये याचे शेवटचे शूटिंग झाले. त्या आधी रिलायन्स स्टुडिओमध्ये शूटिंग केले.
चित्रपटाविषयी एक खास माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, या चित्रपटात श्रीरामाची उंची 10 फुटाची दाखवली जाईल, ज्याप्रमाणे सात हजार वर्षांपूर्वी रामायणात त्याचा उल्लेख करण्यात आला होता. रावणाची उंची 8 फुट दाखवण्यात येईल. चित्रपटात रामाची भूमिका प्रभास तर रावणाची सैफ अली खान साकारणार आहे. दाेन्ही कलाकारांची उंची पोस्ट प्रॉडक्शनमध्ये ग्राॅफिक्सच्या मदतीने वाढवली जाईल. सध्या चित्रीत झालेल्या दृश्याचे एडिटिंग सुरू आहे. मात्र अजून सीतेच्या भूमिकेची कोणतीच माहिती हाती लागली नाही. निर्मात्यांनी ही गोष्ट सर्वांपासूनच लपून ठेवली आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुका लागली आहे की सीतेची भूमिका कोण साकारणार.
यापूर्वी मुंबईत शूट झालेल्या वेळापत्रकात कृती सेननने प्रभास आणि सैफसोबत आपल्या भागाचे शूटिंग केले आहे. आता हैदराबाद 80 ते 90 दिवस शूटिंग करतील. चित्रपटाची माहिती लीक होऊ नये याची पूर्ण खबरदारी प्रॉडक्शन टीमकडून घेतली जात आहे.
असो, सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शीने काही महत्त्वाची माहिती सांगितली, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी अनेक लेखकांच्या व्हर्जनचा वापर केला आहे. क्रिएटिव्ह टीम भगवान रामाच्या उंची बरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्व लार्जर दॅन लाइन करण्यावर भर देत आहे. सामान्य लोकांमध्ये राम आणि रावणाची प्रतिमा लक्षात घेत तशी उंची ठेवण्यात येणार आहे. खरंतर, रामानंद सागर यांच्या रामायणामुळे रामाची जी प्रतिमा लोकांच्या मनात आहे, त्यापेक्षा काही वेगळे करणे जोखीम पत्कारण्यासारखे आहे. वेगळ्या रूपात लोक चित्रपटाचा स्वीकार करतील की नाही हे तर काळच ठरवेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.