आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाउंसमेंट्स ऑफ द डे:अभिनेता प्रभासच्या 'सालार'च्या रिलीज डेटची झाली घोषणा, नवीन पोस्टरवर दमदार लूकमध्ये दिसला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासच्या आणखी एका आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव सालार असे असून हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टरदेखील शेअर केले आहे. या पोस्टरवर प्रभासचा दमदार लूक बघायला मिळतोय.

'सालार'चे पोस्टर आणि रिलीड डेटची घोषणा करताना प्रभासने सोशल मीडियावर लिहिले, 'तुम्हा सर्वांसोबत सालारची प्रदर्शनाची तारीख शेअर करताना मला आनंद होतोय. 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहांत तुम्ही हा चित्रपट बघू शकाल,' असे प्रभास म्हणाला आहे.

'सालार' हा चित्रपट प्रशांत नील दिग्दर्शित करत आहेत. त्यांनीही चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्युल पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर भूवन गोंडा यांनी सोशल मीडियावर सेटवरील एक फोटो शेअर करत पहाडावर चढणे... सालारचे पहिले शूटिंग शेड्युल पूर्ण झाले, असे कॅप्शन दिले होते.

प्रभाससोबत झळकणार श्रुती हासन
या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. श्रुती हासनच्या 35 व्या वाढदिवशी प्रभासने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवर याची माहिती दिली होती. प्रभासने श्रुतीचा एक फोटो शेअर करत तिला शुभेच्छा देताना लिहिले होते, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रुती, सालारमध्ये तुझ्याबरोबर काम करण्याची वाट पहात आहे'. सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील हे आहेत, तर निर्मिती विजय किरंगदूर यांची आहे.

बातम्या आणखी आहेत...