आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे देवा आता हे काय...!:सुपरस्टार प्रभासचा बदलला लूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; समोर आले 'हे' सत्य

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्याचा लूक खूपच बदललेला दिसतोय. प्रभासचे हे रुप पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या फोटोत प्रभास खूप लठ्ठ दिसतोय. त्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. हा फोटो पाहून लोक प्रभासला प्रचंड ट्रोल करत आहेत.

काय आहे व्हायरल फोटोत?
व्हायरल होत असलेल्या प्रभासच्या फोटोमध्ये त्याच्यासोबत रजनीकांत आणि शिवा कुमार देखील दिसत आहेत. एका ट्वीटर अकाउंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "प्रभासला नेमके काय झाले? तो खूप विचित्र दिसतोय."

फोटो समोर आल्यानंतर लोकांनी कमेंट करत प्रभासला नेमके काय झाले, असा प्रश्न विचारत आहेत. तर काहींनी अति दारु प्यायलामुळे प्रभासची अशी अवस्था झाली, असे म्हटले आहे. पण समोर आलेल्या या फोटोचे सत्य काही वेगळेच आहे. या फोटोवर प्रभास किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

बनावट आहे प्रभासचा हा फोटो

खरं तर प्रभासचा व्हायरल झालेला जो फोटो मॉर्फ केलेला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा मॉर्फ फोटो व्हायरल करण्यात आला आहे. प्रभास अगदी फिट आहे.

प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटात बिझी आहे. याशिवाय त्याचा 'सालार' हा आणखी एक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. यासह प्रभास 'प्रोजेक्ट के' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...