आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटसृष्टीत कोरोना:प्रभासचा मेकअपमन कोरोना पॉझिटिव्ह आल्याने 'राधे श्याम'चे चित्रीकरण थांबले, अर्शी खान, राघव जुयाल आणि रोहित भारद्वाज यांनाही झाला संसर्ग

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता कोरोनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आहे. प्रभासच्या मेकअपमनला कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट 30 जुलै रोजी रिलीज होणार होता, मात्र आता यात अडथळा निर्माण झाला आहे.

'राधे श्याम'चे तेलुगू आणि हिंदीमध्ये एकाचवेळी शूटिंग सुरु होते. प्रभाससह या चित्रपटात पूजा हेगडे हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. दुसरीकडे 'बिग बॉस' फेम अर्शी खानलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

अर्शीने सोशल मीडियावर दिली माहिती

‘बिग बॉस-14’ ची स्पर्धक अर्शी खान हिला कोरोनाची लागण झाली आहे. अर्शीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अर्शीने सांगितले, 'काही वेळापूर्वीच मला एअरपोर्ट अथॉरिटी कडून माझा कोविड- 19 रिपोर्ट मिळाला आहे. 19 एप्रिलला माझी चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. कालपासून मला सौम्य लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी नियमांचे पालन करावे, सुरक्षित रहा, अल्लाह तुम्हा सगळ्यांचे रक्षण करो,' अशी पोस्ट अर्शी खानने शेअर केली आहे.

  • राघव जुयाल याला झाला संसर्ग

छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने’चा सुत्रसंचालक राघव जुयाललादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राघवने याची माहिती दिली आहे. राघवने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले, ‘ताप आणि खोकला आल्यानंतर, माझी कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कृपया काळजी घ्या आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करा, सुरक्षित रहा’, अशा आशयाची पोस्ट राघवने शेअर केली आहे.

  • 'महाभारत' फेम अभिनेता रोहित पॉझिटिव्ह

टीव्ही शो महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारणा-या रोहित भारद्वाजलाही कोरोना संसर्ग झाला आहे. रोहितने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. त्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...