आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभूदेवाचे दुसरे लग्न झाले?:रिपोर्ट्समध्ये दावा - मुंबईतील फिजिओथेरपिस्टसोबत विवाहबद्ध झाला प्रभूदेवा, अलीकडेच भाचीसोबत जुळले होते नाव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सप्टेंबरमध्ये दोघांचे लग्न झाले.

डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभूदेवाने अलीकडेच लग्न केल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने मुंबईतील फिजिओथेरपिस्टसोबत लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की प्रभूदेवा आपल्या भाची शोभासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघे लग्न करू शकतात. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

दीड महिन्यांपूर्वी झाले लग्न
इंडिया टुडेने प्रभूदेवाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे, "पूर्वीच्या बातम्या चुकीच्या आहेत. प्रभूदेवाने फिजिओथेरपिस्टशी लग्न केले आहे आणि ती त्याची भाची नाही. सध्या तो चेन्नईमध्ये आहे." पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचे सूत जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रभूदेवाच्या घरी हा लग्नसोहळा झाला. सप्टेंबरमध्ये दोघांचे लग्न झाले.

पहिले लग्न विवाहबाह्य संबंधांमुळे तुटले
1995 मध्ये प्रभुदेवाने रामलताशी लग्न केले होते. लग्नसाठी मुस्लिम असलेल्या रामलताने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. ती एक शास्त्रीय नृत्यांगना होती. लग्नानंतर प्रभूदेवा दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

प्रभूदेवाने ‘विल्लू’ या तामिळ चित्रपटात नयनताराला कोरिओग्राफ केले होते. येथेच दोघांचे सूत जुळले होते. 2010 मध्ये प्रभूने नयनतारासोबतचे नाते स्वीकारुन लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पत्नी रामलताला त्यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर घटस्फोटाचा अर्ज केला. 2011 मध्ये त्यांचे 16 वर्षांचे लग्न संपुष्टात आले. 2012 मध्ये नयनताराने प्रभूदेवाबरोबर ब्रेकअप केले होते.

प्रभूदेवाचे आगामी प्रोजेक्ट
प्रभूदेवा सध्या सलमान खान, दिशा पाटनी आणि रणदीप हूडा स्टारर 'राधे योर मोस्ट वाँटेड भाई' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एवढेच नाही तर तो दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता म्हणून 'पोन मनिकवेल' हा त्याचा 50 वा चित्रपट आहे. या चित्रपटात तो प्रथमच पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser