आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानची नवीन हिरोइन:'अंतिम'मध्ये ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री करणार सलमान खानसोबत रोमान्स, रोमँटिक गाणे झाले शूट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अंतिम' हा प्रज्ञाचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'अंतिम- द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमानसह त्याचा मेहुणा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. आयुष या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत आहे, तर सलमानने पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात सलमानची हिरोईन कोण असेल, यावरुन पडदा उचलण्यात आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या चित्रपटाद्वारे प्रज्ञा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वृत्तानुसार, प्रज्ञा सलमानच्या अपोझिट दिसणार असून तिने शूटिंगलाही सुरुवात केली आहे. सध्या ती महाबळेश्वरमध्ये शुटिंग करत आहे. प्रज्ञाने सलमानसोबत एक रोमँटिक गाणेदेखील शूट केले आहे.

कोण आहे प्रज्ञा जयस्वाल?
'अंतिम' हा प्रज्ञाचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. मात्र ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2014 मध्ये विराट्टू आई डेगा या तेलुगू चित्रपटाद्वारे तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कृष यांच्या कंचे या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

प्रज्ञा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव असते. इंस्टाग्रामवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

'अंतिम- द फाइनल ट्रुथ' हा चित्रपट मराठीतील गाजलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. महेश मांजेरकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सलमान आणि आयुष यांच्यासह निकितिन धीर आणि जीशु सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. तर टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना हिचेही नाव आता समोर आले आहे. ती चित्रपटात आयुष शर्मासह दिसणार असल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असून यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.