आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य आणि बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकदा सरकारवर निशाणा साधताना दिसतात. अनेकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.
काय म्हणाले प्रकाश राज
प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. पहिला फोटो हिटलरचा आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आहेत. मोदींच्या फोटोमध्ये त्यांच्यासमोर मुलं दिसत आहेत. त्यात त्यांच्या आणि मुलांमध्ये काटेरी तार आहे. तर, हिटलरदेखील अशाच प्रकारे दिसतोय. दोन्ही फोटोंची फ्रेम सारखीच आहे. हा फोटो कोलाज केलेला आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली आहे.
"इतिहासाची पुनरावृत्ती होते… भविष्य या काटेरी तारांमागे आहे, आताच सावध व्हा!" असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना हिटलरशी केल्याने युजर्स चांगलेच संतापले आहेत. तर काही जण मात्र त्यांचे समर्थन करतानाही दिसत आहेत.
याआधीही मोदींची हिटलरशी केली होती तुलना
खरं तर प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही प्रकाश राज यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली होती. याआधी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोत नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या फोटोत हिटलर वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी मोदींना हिटलरचा पुनर्रअवतार म्हटले होते. प्रकाश राज यांच्या या ट्वीटवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.