आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय भीमवरून वाद-विवाद:'जय भीम'मध्ये प्रकाश राजने हिंदी भाषा बोलणाऱ्याला कानाखाली लगावले, म्हणाले तामिळमध्ये बोल; चित्रपटाच्या या सीनवरून गोंधळ सुरू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या 'जय भीम' या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र आता या चित्रपटातील एका सीनवर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला आहे.

चित्रपटात प्रकाश राज हिंदी भाषा बोलणाऱ्या एका व्यक्तीच्या कानाखाली लगावले. या सीनवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर हा सीन प्रचंड वेगाने व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. राज साऊथ चित्रपटातील सुपरस्टार प्रकाश राज भुमिकेत आहे.

एका सीनमुळे निर्माण झाला वाद
चित्रपटात दाखवल्याप्रमाणे "प्रकाश राज एका हिंदी भाषिक व्यक्तीच्या कानाखाली लगावले. त्यानंतर तो व्यक्ती प्रकाश राजला विचारतो की, 'तुम्ही मला का मारले.' त्यावर प्रकाश म्हणतात की, तामिळमध्ये बोल." या सीनवरून आता वाद निर्माण होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत हा सीन हटवण्याची मागणी केली आहे.

काहींनी घातला गोंधळ
काही जणांना चित्रपटातील प्रकाश राज यांची हिंदी भाषावरून भुमिका आवडलेली नाही. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपला मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी हे प्रकार चुकीचे असल्याची टीका केली आहे.

सोशल मीडिया एका नेटकऱ्याचे म्हणणे आहे की, "हा चित्रपट हिंदी भाषेच्या विरोधात नसून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे वाक्य वापरण्यात आलेले नाही. त्या सीनमध्ये तो माणूस प्रकाश राज यांना हिंदीमध्ये बोलून पळ काढण्याच्या तयारीत होता. त्याची चाल प्रकार राज यांना कळते, त्यामुळे ते त्याच्या कानाखाली लगावत हिंदीमध्ये बोल असे सांगतात." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, "विरोध करून काहीच फायदा नाही सुरूवातीला तुम्ही एकदा चित्रपट पाहा. त्यानंतरच यावर गोंधळ घाला" असे म्हटले आहे.

'जय भीम' हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी या भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात 1993 मधील घटनेला दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...