आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात:शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला पोहोचले प्रकाश राज, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले, 'माझ्यासाठी प्रार्थना करा'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले प्रकाश राज?

बॉलिवूड आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात झाला आहे. स्वतः प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांच्यावर हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?
अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उपचारांसाठी त्यांचे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे हैदराबादला जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनी लिहिले, 'मी पडलो आहे. त्यामध्ये एक छोटेसे फ्रॅक्चर झाले आहे. आता मी हैदराबाद येथील माझे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे जात आहे. ते माझ्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. मी लवकरच बरा होईल, काळजी करण्याचे काही कारण नाही. माझ्यासाठी प्रार्थना करा,' असे ते म्हणाले आहेत.

प्रकाश राज यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रकाश राज यांचा सहकलाकार अभिनेता आणि निर्माता बंधाल गणेश आणि नवीन मोहम्मदी यांनी देखील त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश राज यांनी सलमान खान स्टारर 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'वाँटेड' चित्रपटात गनी भाईची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे त्यावेळी खूप कौतुक झाले होते. त्यानंतर त्यांनी 'सिंघम'मध्ये जयकांत शिकरे ही खलनायकी भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली की आज अनेक लोक त्यांना या नावने ओळखतात. या भूमिकेसाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय त्यांनी 'दबंग', 'बुड्ढा होगा तेरा बाप', 'भाग मिल्खा भाग' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...