आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:'प्रस्थानम' फेम अभिनेता सत्यजित दुबेच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, अभिनेत्याने बहिणीसोबत स्वत:ला केले आयसोलेट 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्यजितने सांगितले, आम्ही तिची कोरोनाची चाचणी घेतली आणि अहवाल सकारात्मक आला.

'प्रस्थानम' या चित्रपटात झळकलेला अभिनेता सत्यजित दुबेची आई सविता दुबे यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, त्यानंतर अभिनेत्याने स्वतःला बहिणीसोबत आयसोलेट केलं आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सत्यजितने सांगितले की ,काही दिवसांपासून त्याची आई मायग्रेन आणि उच्च तापाची तक्रार करत होती, त्यानंतर तिची कोरोना टेस्ट करण्यात आली.

सत्यजितने  आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्याच्या आईला कोरोना असल्याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले, 'माझी आई, बहीण आणि माझ्यासाठी गेले काही दिवस खूप कठीण होते. माझी आई ठीक नव्हती. याची सुरूवात मायग्रेन, ताप आणि अंगदुखीच्या समस्येने झाली. आम्ही तिची कोरोनाची चाचणी घेतली आणि अहवाल सकारात्मक आला.'

नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे दाखल 

सत्यजित पुढे म्हणाला, 'आईला ऑब्जर्वेशनसाठी नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. मला खात्री आहे की ती आणखी बरी होऊन बाहेर येईल. मी व माझी बहीण दोघेही घरी पूर्णपणे आयसोलेट झाले आहोत आणि आतापर्यंत आम्हाला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत'. सोबतच त्याने वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभारही मानले.

अभिनेता सत्यजित दुबे संजय दत्त स्टारर फिल्म ‘प्रस्थानम’ मध्ये दिसला आहे. यासह तो स्टार प्लसवरील 'महाराज की जय हो' या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसला.  

बातम्या आणखी आहेत...