आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:'द बिग बुल'मधील अभिषेक बच्चनसोबत होणा-या तुलनेवर प्रतीक गांधी म्हणाला - 'अभिषेकशी माझ्या कामाची तुलना करणे योग्य नाही'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता अभिषेकच्या पात्राची प्रतीकसोबत तुलना होत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. ‘द बिग बुल’च्या आधी याच कथेवर वेब सीरिज ‘स्कॅम 1992’ आली होती. 1992 मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आणि ही वेब सीरिज आधारित आहे. वेब सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधीने मुख्य भूमिका वठवली होती. त्याच्या अभिनयावरून खूप कौतुक झाले होते. ‘स्कॅम 1992’ प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस आली होती. यामुळे आता अभिषेकच्या पात्राची प्रतीकसोबत तुलना होत आहे. या तुलनेवरून प्रतीक गांधीने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रतीक म्हणतो, 'मला नाही वाटत कोणत्याही दोन व्यक्ती, ज्या कलाकार आहेत त्यांची तुलना करायला हवी. आम्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. जसे आम्ही विचार करतो, काय वाटते, भावनाही वेगवेगळ्या असतात. यामुळे कोणतीही तुलना करण्याला अर्थ नाही. दोन कलाकारांना पटकथा आणि त्याच्या भूमिकेच्या आवश्यकतेनुसार बघितले जायला हवे. मी स्वत:ही अद्याप ‘द बिग बुल’ पाहिलेला नाही. तो बघण्यास उत्सुक आहे.'

अभिषेक बच्चन स्टारर ‘द बिग बुल’ हा चित्रपट 8 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेकसह इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. .

वेब सीरिजची कथा 'द स्कॅम' या पुस्तकावर आधारित आहे

देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या 'द स्कॅम' या पुस्तकावर ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज आधारित आहे. एका प्रसिद्ध स्टॉकब्रोकर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन कशी घसरली जाते हे यातून दाखवण्यात आले आहे. या घोटाळ्याने शेअर बाजार आणि बँका यांच्या काम करण्याच्या पद्धतीत किती त्रुटी होत्या ते उघड केले.

बातम्या आणखी आहेत...