आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वतःच्या कर्तुत्वावर माया नगरीत आपली वेगळी छबी उंमटवणारी प्रतीक्षा चांडक हिने मायानागरी मध्ये सर्वात लहान वयाची स्टायलिस्ट म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका छोट्यासा तालुक्यामधून आपला कर्तृत्वाचा झेंडा फडकवून तिने अकोट तालुक्याचे नाव सातासमुद्रापार नेले आहे.
टीव्ही आणि सिनेमांमध्ये पडद्यावर दिसणाऱ्या विविध कलाकारांना आपण प्रभावित होतो. पण या कलाकारांना चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी अनेकांची मेहनत कामी आलेली असते. यामध्ये 'स्टायलिस्ट' नावाच्या व्यक्तीचा फार मोठा वाटा असतो. विविध कलाकारांचे व्यक्तिमत्व पाहून त्यांना कोणते कपडे घालणे, कोणते दागिने घालणे, मेकअप कसा करावा या बाबत बारीक-सारीक मार्गदर्शन स्टायलिस्ट नावाची व्यक्ती करीत असते. हेच काम प्रतीक्षा फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत करतेय. प्रतीक्षाने कलर्स, झी मराठीवरील प्रसिद्ध कलाकारांना स्टायलिस्ट म्हणून सेवा दिली आहे. 'नटरंग' फेम सोनाली कुलकर्णी हिची स्टायलिस्ट म्हणून प्रतीक्षा चांडकला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
शिवाय गुरमीत चौधरी, हिमांश कोहली, दिव्यांका त्रिपाठी, आकांक्षा सिंग, प्राजक्ता माळी, अभिज्ञा भावे, अर्पणा दीक्षित, हेली शाह, रिद्धी डोगरा यांच्यासोबत ती काम करतेय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.