आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:मिहिका बजाज आणि राणा डग्गुबाती यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात, वधूच्या घरी पोहोचली लग्नाची पहिली पत्रिका 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणा-मिहिकाचे लग्न 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. राणाचे कुटुंबीय लग्नाच्या पहिली विधीनुसार लग्न पत्रिकालूसह मिहिकाच्या घरी गेले. जिथे मिहिकाच्या कुटुंबीयांना लग्नाचे पहिले कार्ड देण्यात आले. मिहिकाने तिच्या इंस्टाग्रामवर या विधीचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • लॉकडाऊनमध्ये झाला साखरपुडा आणि रोका सेरेमनी

या विधीसाठी मिहिकाने जयंती रेड्डीने डिझाइन केलेला मिंट ग्रीन लेहेंगा परिधान केला होता. राणा-मिहिकाचे लग्न 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. हे दोघेही हैदराबादच्या लक्झरी पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, राणा आणि मिहिका यांनी 12 मे रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. 21 मे रोजी दोघांचीही रोका सेरेमनी झाली. 

  • ब्रँडने केले मिहिकाच्या लूकचे वर्णन 

मिहिकाच्या ज्वेलरी ब्रँडने आपल्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लूकची माहिती उघड केली आहे. मिहिकाने या विधी वेळी पोल्कीपासून बनवलेला हार घातला होता. ज्यामध्ये 18 कॅरेट सोन्यासह रुबी आणि पिंक टर्मलीन वर्क होते. यासह मांग टीका देखील माणिक आणि पोल्कीपासून बनवला होता. यासह मिहिकाने 22 कॅरेटचे ब्रेसलेट कॅरी केले होते. 

बातम्या आणखी आहेत...