आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुस-यांदा आई होत असलेल्या करीना कपूरची डिलिव्हरी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत याला दुजोरा दिला. यापूर्वी अनेक रिपोर्टमध्ये करीनाची प्रसुती मार्च महिन्यात होणार असल्याचे म्हटले गेले होते.
फिल्मफेअरशी बोलताना सैफ म्हणाला की, करीनाची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डिलिव्हरी होणार आहे. सैफने सांगितले, "गेल्या काही महिन्यांपासून सर्व काही शांततेत चालू आहे. मला कधीकधी असे वाटते की अचानक बेबी माझ्याकडे येईल आणि मला 'हाय' म्हणेल. आम्ही सर्व जण लहान पाहुण्याच्या आगमनाविषयी खूप उत्सुक आहोत."
यादरम्यान, दुसरे मूल होणे ही मोठी जबाबदारी आहे, असेही सैफने म्हटले. त्याच्या मते, तो याविषयी थोडा घाबरलेला सुद्धा आहे.
सैफ आणि करीना यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबईत लग्न केले होते. 20 डिसेंबर 2016 रोजी त्यांचा मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला. 12 ऑगस्ट 2020 रोजी सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी) हिच्या 25 व्या वाढदिवशी सैफ-करीनाने ते दुस-यांदा आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते.
करीना कपूर सध्या वर्क कमिटमेंट्स पूर्ण करण्यात बिझी आहे. दुस-या बाळाच्या जन्मापूर्वी तिला आपली सर्व कामे पुर्ण करायची आहेत. ती आमिर खानसह 'लालसिंग चड्ढा' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला रिलीज होण्याची शक्यता आहे. तर सैफ अलीकडेच तांडव या वेब सीरिजमध्ये दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'बंटी और बबली 2' आणि 'भूत पुलिस'चा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.