आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Preity Zinta Gets Angry With Fans: Actress Gives A Sarcastic Reply To Those Who Troll Her Mother In Law, Says Fame Does Not Work In Family Love And Respect Does

ट्रोलर्सवर भडकली प्रीती झिंटा:सासूला ट्रोल करणा-यांना प्रीतीने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली - 'कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीतीने आपल्या सासूबाईंना म्हटले थँक यू

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या सासूबाईंसोबतचा एक फोटो शेअर करत त्यासह एक नोटदेखील लिहिली होती. मात्र कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने प्रीतीच्या सासूबाईंचा अनादर करणारी कमेंट टाकली होती, त्यावर प्रीतीने ट्रोल करणा-याला सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रीतीने आपल्या सासूबाईंना म्हटले थँक यू
प्रीतीने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या दुसऱ्या आईला मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराला लहानाचे मोठे केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल, मला मस्ती करु दिल्याबद्दल आणि मला तुमच्या सुनेपेक्षा मुलीसारखे सांभाळल्याबद्दल धन्यवाद,' अशा अशायचे कॅप्शन प्रीतीने दिले होते.

यूजरने प्रीतिच्या पोस्टवर दिली आक्षेपार्ह कमेंट
प्रीतीच्या या पोस्टवर एका नेटक-याने लिहिले, 'हे सगळं लोकप्रियतेमुळे आहे. यामुळे कोणतीही सासू तुम्हाला मस्ती करायला शिकवेल.' या कमेंटवर प्रीतीने उत्तर देताना लिहिले,'कुटुंबात लोकप्रियता काम करत नाही, प्रेम आणि आदर करते.'

पाच वर्षे डेट केल्यानंतर प्रीती-जीन यांनी केले होते लग्न
प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची जीन गुडइनफसोबतची पहिली भेट एका लाइव्ह चॅटदरम्यान झाली होती. जीन लॉस एंजिलिस येथील सँटा मोनिका येथे फायनॅन्शिअल एनालिस्ट आहेत. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...