आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नुकतेच गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यावेळी प्रीती पिंक कलरच्या पंजाबी सूटमध्ये दिसली. तिने डोकं ओढणीने झाकले होते. सोबतच तिने मास्कही घातला होता.
इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
प्रीतीने शेअर केलेल्या व्हिडिओत कामाख्या मंदिराचा परिसर दिसत आहे. व्हिडिओमध्ये जवळपासची दुकाने आणि एक तलावही दिसत आहे. त्याचबरोबर मंदिराच्या एका पुजाऱ्याने अभिनेत्रीला कामाख्या मंदिराची मूर्तीही भेट दिली आहे.
रात्रभर जागून मंदिरात पोहोचले
व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले, "गुवाहाटीला जाण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट देणे. आमच्या फ्लाइटला बराच उशीर झाला आणि त्यामुळे मी रात्रभर जागी होते. पण जेव्हा मी मंदिरात गेले, तेव्हा हे सगळे सार्थकी लागले, असे वाटले. येथे येऊन मनाला खूप शांतता मिळाली आणि सकारात्मक विचार करायची शक्ती मिळाली," असे प्रीती म्हणाली.
चाहत्यांना म्हणाली - गुवाहाटीला गेलात तर नक्की भेट द्या
प्रीतीने पुढे लिहिले, "तुमच्यापैकी कुणी गुवाहाटीला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. जय मां कामाख्या - जय माता दी."
सध्या प्रीती सिनेसृष्टीपासून दूर आपल्या पती आणि मुलांसोबत वेळ घालवतेय. 2021 मध्ये ती आणि तिचा पती जीन गुडइनफ जिया आणि जय या जुळ्या मुलांचे आईबाबा झाले. सरोगसीच्या माध्यमातून प्रीतीच्या मुलांचा जन्म झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.