आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा वर्षभरापूर्वी जुळ्या मुलांची आई झाली. वयाच्या 46 व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने तिला मातृत्व लाभले. 11 नोव्हेंबर 2021 रोजी तिच्या घरी एक मुलगा आणि एका मुलीचे आगमन झाले. आज तिच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस आहे. आज मुलांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतीने एक खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांची झलक दाखवली आहे. जय आणि जिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत. प्रितीची ही दोन्ही मुले फारच गोंडस आहेत.
प्रितीने दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त दोन खास पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये मुलगा जयचा फोटो शेअर करत प्रीतीने लिहिले, "मी आयुष्यामध्ये अनेक भूमिका साकारल्या. पण खऱ्या आयुष्यात आई ही भूमिक साकारताना इतर भूमिका त्यापुढे फिक्या वाटतात. मी प्रत्येक दिवशी तुझ्यावर खूप प्रेम करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरी जान," असे ती म्हणाली आहे. यासह तिने #हॅपी बर्थडे, #मेराजय आणि #वन इयर ओल्ड हे हॅशटॅग वापरले आहेत.
मुलगी जियाचा फोटो शेअर करत प्रीती म्हणते, "मला माहित होते की तू माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेस. मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आणि आज तू येथे माझ्यबरोबर आहे. हास्य, सहवास आणि मिठी यासाठी जिया आयुष्यभर मी तुझी ऋणी राहिन. माझ्या लहान बाहुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते,' असे प्रीती म्हणाली आहे. यासोबत तिने #हॅपी बर्थडे, #वन इयर ओल्ड आणि #मेरी जिया हे हॅशटॅग वापरले आहेत.
सोशल मीडियाद्वारे दिली होती मुलांच्या जन्माची बातमी प्रीतिने वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या जन्माची बातमी दिली होती. तिने लिहिले होते, 'मला आज सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची अंतःकरणे कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेली आहेत, कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ आमच्या कुटुंबात स्वागत करत आहोत,' अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली होती.
पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते जीन आणि प्रीतीचे लग्न प्रीती झिंटाने 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजिलिसमध्ये एका खासगी समारंभात आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न केले होते. हा विवाह राजपूत पद्धतीने पार पडला होता. प्रीती आणि जीन यांनी सीक्रेटली लग्न केले होते आणि लग्नाच्या 6 महिन्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. दोघेही अमेरिकेत राहतात. जीन हे लॉस एंजिलिसमध्ये व्यवसायाने आर्थिक विश्लेषक आहेत.
प्रीतीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2018 मध्ये आलेला 'भैयाजी सुपरहिट' हा तिचा शेवटचा चित्रपट होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.