आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:लग्नाच्या 5 वर्षानंतर 46 वर्षीय प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई, सोशल मीडियावर सांगितली सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुला-मुलीची नावे

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जय आणि जीया ही प्रीतीच्या मुलांची नावे आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आई झाली आहे. 46 वर्षीय प्रीती सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली आहे. स्वतः प्रीतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

प्रीतीने लिहिले, 'मला आज सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची अंतःकरणे कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेली आहेत, कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ आमच्या कुटुंबात स्वागत करत आहोत,' अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

प्रीतीने पुढे लिहिले, 'आम्ही आयुष्याच्या या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहोत. या सुंदर प्रवासासाठी आम्ही आमचे डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे आभार मानू इच्छितो.'

पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते जीन आणि प्रीतीचे लग्न

प्रीती झिंटाने 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये एका खासगी समारंभात आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न केले होते. हा विवाह राजपूत पद्धतीने पार पडला होता. प्रीती आणि जीन यांनी सीक्रेटली लग्न केले होते आणि लग्नाच्या6 महिन्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. दोघेही अमेरिकेत राहतात. जीन हे लॉस एंजेलिसमध्ये व्यवसायाने आर्थिक विश्लेषक आहेत.

प्रीतीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2018 मध्ये आलेला 'भैयाजी सुपरहिट' हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

बातम्या आणखी आहेत...