आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम चोप्रा यांचा वाढदिवस:हीरो बनण्यासाठी मुंबईत आले होते प्रेम चोप्रा पण बनले खलनायक, दहशत एवढी की त्यांना बघून लोक त्यांच्या बायकांना लपवत असे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेम चोप्रांना व्हायचे होते हीरो

प्रेम चोप्रा यांची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये होते. या अभिनेत्याचा अभिनय बघून सामान्य लोक खासगी आयुष्यातही त्याला खलनायकच समजत होते. वयाची 86 वर्षे पूर्ण करणा-या प्रेम चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला बघून लोक त्यांच्या बायकांना लपवत होते.

चोप्रा यांनी सांगितले होते, 'होय हे खरे आहे. मला बघून लोक त्यांच्या बायकांना लपवत होते. मी लोकांकडे गेल्यावर लोक मला ख-या आयुष्यातही खलनायकच समजत होते. पण ही गोष्ट कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. मी काम चांगले करतोय, याचे मला समाधान लाभत होते."

डॉक्टर व्हावे अशी होती वडिलांची इच्छा
23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोर (आता पाकिस्तानात) येथे त्यांचा जन्म झाला. सहा बहीणभावंडांमध्ये ते तिस-या क्रमांकावर होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब शिमल्यात स्थायिक झाले. येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पंजाब विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनापासूनच त्यांना अभिनयात रुची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्यांनी डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र प्रेम चोप्रा यांनी स्पष्ट शब्दांत यासाठी नकार दिला आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 च्या दशकाच्या शेवटीशेवटी मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्कुलेशन विभागातही नोकरी केली.

दरम्यान त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. त्यावेळी त्यांची बहीण अंजू ही केवळ नऊ वर्षांची होती. अंजूची जबाबदारी प्रेम चोप्रा आणि त्यांच्या चार भावांवर आली होती. प्रेम यांनी अंजू यांचे मुलीसारखे संगोपन केले.

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णाची बहीण उमासोबत झाले लग्न
प्रेम चोप्रा यांचे लग्न उमा यांच्यासोबत झाले आहे. उमा या कृष्णा कपूर (राज कपूर यांच्या पत्नी), प्रेमनाथ आणि राजेंद्रनाथ यांच्या भगिनी आहेत. दिग्दर्शक लेख टंडन यांनी उमा यांचे स्थळ प्रेम चोप्रांसाठी आणले होते. या दाम्पत्याला तीन मुली असून रकिता, पुनीता आणि प्रेरणा चोप्रा अशी त्यांची नावे आहेत. रकिताचे लग्न पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदासोबत झाले आहे. तर दुसरी कन्या पुनीताचे मुंबईतील वांद्रा येथे विण्ड चिम्स नावाची प्री-स्कूल आहे. तिचे लग्न टीव्ही अभिनेता आणि गायक विकास भल्लासोबत झाले आहे. धाकटी मुलगी प्रेरणा ही बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीची पत्नी आहे.

प्रेम यांची नातवंडं
पुनीता आणि विकास यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सांची आणि वीर ही त्यांची नावे आहेत. तर शर्मन आणि प्रेरणा यांनाही एकुण तीन मुले आहेत. अयाना, विहान आणि वर्यान ही त्याच्या मुलांची नावे आहेत. विहान आणि वर्यान ही जुळी मुले आहेत. रकिता आणि राहुल यांना रिशा नावाची एक मुलगी आहे.

प्रेम चोप्रा यांची थोरली कन्या रकिता नंदाने प्रेम यांच्या जीवनावर 'प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा' हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले आहे. एप्रिल 2014 मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

प्रेम चोप्रांना व्हायचे होते हीरो
प्रेम चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "इतर अभिनेत्यांप्रमाणेच मीदेखील सुरुवातीला इंडस्ट्रीत हीरो बनण्यासाठी आलो होतो. काही पंजाबी चित्रपटांमध्ये मी हीरोची भूमिका साकारली होती, जी लोकांनी पसंतही केली. पण ज्या हिंदी चित्रपटांमध्ये मी हीरो किंवा मध्यवर्ती भूमिका साकारल्या, ते चित्रपट फ्लॉप ठरले. चित्रपट फ्लॉप ठरल्याने इंडस्ठ्रीत जास्त संधी मिळाल्या नसल्या. त्यामुळे मी निगेटिव्ह भूमिका स्वीकारणे सुरु केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या भूमिकांमुळे मी हिट ठरलो."

करिअरमध्ये दिले होते 250 रेप सीन
प्रेम चोप्रा यांनी आपल्या करिअरमध्ये 'शहीद' (1965), 'बॉबी' (1973), 'बेताब' (1983), 'गुप्त' (1997) आणि 'कोई मिल गया' (2003) सह सुमारे 380 चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटांमध्ये त्यांनी एकुण 250 रेप सीन दिले होते. प्रेम चोप्रा यांना मात्र असे सीन करणे पसंत नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, "असे सीन करताना मी माझ्या को-अॅक्ट्रेसला विश्वासात घ्यायचो. सीन करताना काही बरवाईट होऊ नये, याचा मी प्रयत्न करायचो. ऑन स्क्रिन इमेजमुळे माझी खासगी आयुष्यातील प्रतिमा मलीन होऊ नये, हे सतत माझ्या डोक्यात असायचे. जर चित्रपटांमध्ये खरंच गरज असेल, तरच रेप सीन टाकायला हवेत, असे माझे मत आहे. पण दुर्दैवाने कमर्शिअल चित्रपटांमध्ये गरज नसतानाही असे सीन टाकले जातात."

बातम्या आणखी आहेत...