आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहीत आहे का?:प्रेमनाथ चोप्रा यांची मधुबालासोबत होती प्रेमाची चर्चा, 6 महिने टिकले होते नाते; 14 वर्षे घेतला होता चित्रपटसृष्टीपासून संन्यास 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1972 - ‘शोर’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारात प्रेमनाथ यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून नामांकन मिळाले होते.
 • 1973 मध्ये ‘अमीर गरीब’ आणि ‘रोटी, कपडा और मकान’ साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्यासाठी फिल्मफेअरमध्ये नामांकन.
 • 1974 मध्ये ‘बॉबी’ चित्रपटासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून नामांकन मिळाले.

एखादी स्टाइल, लकब अशा ठरावीक साच्यातील गोष्टी न करता केवळ आपल्या अभिनयाच्या बळावर लोकांच्या मनात घर करणारा कलाकार म्हणजे प्रेमनाथ. त्यांना पाहून अनेक रोल लिहिले गेले की काय, असे वाटण्याइतपत ते सहजतेने पडद्यावर वावरत असत. सिने सृष्टीत एक नायक म्हणून राज्य करणारा नव्हेतर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात छाप सोडणाऱ्या प्रेमनाथचा एक संवाद खूप गाजला.. तो आजही लोकांच्या स्मरणात आहे. जितेंद्र अिभनीत ‘लोक परलोक’ मधील यमराजच्या पात्रतील हाच तो संवाद धर्म रक्षक हूं.. नरक लोक का शासक हूं..यमराज हूं...!

प्रेम नाथ यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 मध्ये पेशावरच्या घंटाघर भागात करीमपुरा येथे झाला. ते लहानपणापासूनच शंकराची पूजा करत. प्रेमनाथ आईसोबत घरात शिवस्तुती करत असत. ते 5 वर्षांचे असताना दुर्दैवाने त्यांच्या आईचे निधन झाले. फाळणीच्या वेळी ते कुटुंबासोबत मध्य प्रदेशच्या जबलपूरला आले.

 • तिकीट तपासणाऱ्याने चापट मारली म्हणून विकत घेतली अॅम्पायर टॉकीज

शाळेत असताना प्रेमनाथ एकदा अॅम्पायर टॉकीजची भिंत ओलांडून तिकीट न घेत टॉकीजमध्ये घुसले. तेव्हा एक तिकीट तपासणारा तेथे आला आणि तिकीट तपासू लगाला. प्रेमनाथने त्याला सांगितले मी भिंत अेालांडून आलो आहे, माझ्याकडे तिकीट नाही. टीसीने त्यांना चापट मारली आणि बाहेर काढले. ज्या भिंतीवरून आला आहे तीच भिंत ओलांडून परत जा, असे म्हटले. जायच्या आधी प्रेमनाथ त्या टीसीला म्हणाले, एक दिवस मी ही टॉकीज विकत घेईन. मोठे झाल्यावर प्रेमनाथ वडिलांच्या इच्छेविरुद्ध अभिनय करण्यासाठी मुंबईला निघून गेले. 1952ला त्यांनी अॅम्पायर टॉकीज विकत घेतली. योगायोगाने चापट मारणारा तो टीसी त्यावेळी तेथेच काम करत होता. प्रेमनाथने त्याला बोलावले आणि ज्या खुर्चीवरून त्यांना पळवले हेाते त्याच खुर्चीवर जाऊन बसले.

 • पृथ्वीराज कपूरला लिहीत होते पत्र म्हणत..., मला हीरो बनवा

बालपणापासूनच प्रेमनाथ यांची हीरो होण्याची इच्छा होती. चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड होती. पृथ्वीराज कपूर त्यांच्या दूरच्या नात्यातील होते. त्यांना ते नेहमी चिठ्ठी लिहीत असत आणि मला तुमच्याकडे बोलवा, मला हीरो बनायचे आहे, मला संधी द्या, अशी विनंती करत असत. मात्र, त्यांच्या एकाही पत्राचे कधीच उत्तर आले नाही. त्यांचे वडील पोलिस विभागात आयजी होते, मुलाने आपल्यासारखे व्हावे किंवा लष्करात जावे अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी प्रेमनाथ यांना लष्करात पाठवले.

 • अभिनेता होण्याचा माेह आवरला नाही, वडिलांना खोटे बोलून मागितले शंभर रुपये

प्रेमनाथ सैन्यात भरती झाले होते, पण सिनेमाबद्दलचे त्यांचे आकर्षण कमी झाले नव्हते. मग त्यांनी वडिलांना पत्र लिहून खोटे सांगितले आणि बंदूक खरेदी करण्यासाठी शंभर रुपये मागितले. वडिलांनी विश्वास ठेवला आणि त्यांना पैसे पाठविले. पैसे मिळताच प्रेमनाथ मुंबईला रवाना झाले. तेथे त्यांची भेट पृथ्वीराज कपूरसोबत झाली. प्रेमनाथ यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम मागितले. पृथ्वी थिएटरमध्येच प्रेमनाथ यांची भेट राज कपूर यांच्याशी झाली. ही भेट आधी मैत्री आणि नंतर नात्यात बदलली. खरं तर, राज कपूर एकदा प्रेमनाथसोब जबलपूरला गेले होते. तेथे प्रेमनाथची बहीण कृष्णाशी राजकपूर यांची भेट झाली, नंतर दोघांंचे लग्न झाले.

 • ‘आग’ आणि ‘बरसात’मधून मिळाले यश ‘औरत’ने बनवले अभिनेता

1948 मध्ये रिलीज झालेल्या ‘अजीत’ मधून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. चित्रपट हिट ठरला मात्र प्रेमनाथ यांना विशेष यश मिळाले नाही. त्यानंतर ‘आग’ आणि ‘बरसात’मध्ये त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. यानंतर प्रेमनाथ यांना 50 च्या दशकात अनेक मोठ्या अभिनेत्रीसोबत हीरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यात रमोला, मधुबाला, सुरैया, निगार सुलताना आणि बीना राय सारख्या अभिनेत्रींचा समावेश होता. मेहबूब खानच्या ‘आन’मध्ये त्यांच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. त्यातच 1953 मध्ये आलेल्या ‘औरत’ने त्यांचे व्यक्तिमत्त्वच बदलून टाकले.

 • बीना रायसोबत पहिल्या भेटीत काहीच बोलले नाहीत प्रेमनाथ

अभिनेत्री बीना राय, प्रेमनाथ यांचा अभिनय पाहून प्रभावित झाल्या होत्या. दोघांची जेव्हा भेट झाली तेव्हा बीना खूपच एक्सायटेड होत्या, त्यांचे हात थरथरत होते. तर बीना यांचे सौंदर्य आणि साधेपणा पाहून प्रेमनाथ मंत्रमुग्ध झाले होते त्यामुळे ते काहीच बोलू शकले नाही. हळूहळू हे नाते प्रेमात बदलले आणि नंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर प्रेमनाथ आणि बीना राय यांनी एक प्रॉडक्शन हाऊस ‘पीएन फिल्म्स’ची स्थापना केली. त्या अंतर्गत ‘शगूफा’, ‘समंदर’, ‘चंगेज खान’सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, निर्माते म्हणून त्यांना हवे तसे यश मिळाले नाही.

 

 • मधुबालासोबतही होती प्रेमाची चर्चा 6 महीने टिकले नाते

बीना यांच्याशी लग्न करण्याआधी मधुबालासोबत त्यांच्या प्रेमाची चर्चा होती. त्यांनी 18 चित्रपट साइन करुन ठेवले होते. दोघांच्या प्रेमाचे किस्सेही प्रसिद्ध झाले होते.नंतर बीनासेाबत त्यांची जवळीक वाढली आणि त्यांनी मधुबालासोबतचे नाते तोडून बीनासोबत लग्न केले. त्यांचे नाते फक्त 6 महिने टिकले. त्यामुळे त्यांनी साइन केलेले ते चित्रपटदेखील सोडून दिले.

 • काही काळ संन्यास घेतला

चित्रपटातून संन्यास घेण्याचे प्रेमनाथने एकदा ठरवले आणि ते खरचं चित्रपटापासून दूर झाले. नंतर ते 14 वर्षांपर्यंत तीर्थयात्रा करत राहिले. यादरम्यान त्यांनी ज्योतिष आणि धर्माची अनेक पुस्तके वाचली. त्यांनी संन्यास्यासारखे जीवन घालवले. दीर्घ काळानंतर 1970 मध्ये त्यांनी पुन्हा अभिनयाची सुरुवात केली. तेव्हा देवानंद यांच्या ‘जॉनी मेरा नाम’मध्ये राय साहेबाची भूमिका केली. प्रेमनाथ यात खलनायकाच्या भूमिकेत होते त्यानंतर ते अनेक चित्रपटांत खलनायकाच्या भूमिकेत दिसले.

बातम्या आणखी आहेत...