आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:प्रचंड दबाव असूनही 'सूर्यवंशी', 'राधे'सारखे चित्रपट OTT वर रिलीज करण्यास निर्माते तयार नाहीत, कारण म्हणजे थिएटरमधून येणारे कलेक्शन येथे मिळू शकत नाही

अमित कर्ण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 एप्रिल रोजी 'सूर्यवंशी' आणि 13 मे रोजी 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' प्रदर्शित होणार होता.

कोरोना निर्बंधामुळे उत्तरेत थिएटर उघडण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत 'सूर्यवंशी', 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई', 'चेहरे' यांसारखे बिग बटेज चित्रपट OTT वर आणण्यासाठी निर्मात्यांवर मोठा दबाव आहे. मात्र या चित्रपटांचे निर्माते हे चित्रपट ओटीटीवर नव्हे तर थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या मतावर ठाम आहेत. सलमान खानने तर राधे हा चित्रपट यावर्षी ईदवर चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही तर तो थेट पुढील वर्षी ईदवर प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे 'सूर्यवंशी' आणि 'चेहरे' या चित्रपटांच्या निर्मांत्याच्या म्हणण्यानुसार, येत्या मे पर्यंत परिस्थिती चांगली होईल. त्यानंतर चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित केली जातील.

व्यापार विश्लेषकांनी सांगितले काय आहे कारण?
'सूर्यवंशी'चे उदाहरण देताना व्यापार विश्लेषक म्हणतात, 'जर चित्रपट आधी ओटीटी आणल्यास चित्रपटाला 50 कोटींपेक्षा जास्त फायदा होणार नाही, पण जर चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहात आणला तर 100 कोटींचा नफा होऊ शकतो. हे गणित जवळजवळ प्रत्येक बिग बजेटच्या चित्रपटांसाठी आहे. म्हणूनच 'सूर्यवंशी', 'राधे', 'सत्यमेव जयते 2' ते '83' पर्यंत सर्व निर्माते चित्रपटांच्या थिएटर रिलीजवर जोर देत आहेत."

थिएटरमधून येणारे कलेक्शन ओटीटी मिळवून देऊ शकत नाही
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, 'तुम्ही ओटीटीवर एखादा चित्रपट आणता तेव्हा तुम्हाला आधीच नफा मिळतो. परंतु थिएटरमधून येणारे कलेक्शन ओटीटी देऊ करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, 'स्त्री' या चित्रपटाचा निर्मिती खर्च 12 कोटी होता. ओटीटीवर त्यासाठी 15 कोटीसुद्धा मिळू शकत नाही, परंतु जर चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तर 150 कोटींचे कलेक्शन करु शकतो.'

ओटीटी कंपन्यांना हवेत मोठे थ्रिलर चित्रपट

'चेहरे' या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित म्हणतात, 'ओटीटीवर चित्रपट लावण्यासाठी प्रचंड दबाव आहे. कारण पाच ते सहा मोठ्या ओटीटी कंपन्या आहेत, त्यांना फक्त मोठ्या चित्रपटांची आवश्यकता आहे. विशेषत: थ्रिलर जॉनरचे. पण आम्ही सध्या चित्रपट होल्डवर ठेवला आहे. कारण आम्ही लार्जर दॅन लाइफ चित्रपट बनवला आहे. मे अखेरीस थिएटर सुरू होतील, अशी आशा आहे. आम्ही जून-जुलै पर्यंत चित्रपट प्रदर्शित करु.'

बातम्या आणखी आहेत...