आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिंपल गर्लचा 45 वा वाढदिवस:वयाच्या 13 व्या वर्षी प्रीती झिंटावर कोसळला होता दुःखाचा डोंगर, अपघातात झाला होता वडिलांचा मृत्यू, आईला सावरायला लागली होती दोन वर्षे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका ऑडिशन दरम्यान शेखर कपूर यांनी प्रीतीला पाहिले आणि तिला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा 31 जानेवारीला 45 वर्षांची होणार आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये प्रीतीचा समावेश आहे. 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'कोई मिल गया', 'सलाम नमस्ते', 'वीर जारा' यासारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम करून तिने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. मागील जरी गेल्या काही वर्षांपासून ते काम करत होते. मागील काही वर्षांपासून प्रीती चित्रपटसृष्टीपासून दूर असून एक उद्योजिका म्हणून आपल्या कारकीर्दीला आकार देत आहे. प्रीती आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे जिथे ती तिचा पती जीन गुडइनफ याच्याबरोबर राहते.

कमी वयातच वडिलांचे छत्र हरपले
प्रीतीचा जन्म 31 जानेवारी 1975 रोजी हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे झाला. दुर्गानंद झिंटा आणि नीलप्रभा ही तिच्या आईवडिलांचे नाव होते. प्रीतीचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. प्रीती 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातात तिच्या आईलाही गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्या दोन वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. ब-याच उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही. या घटनेचा प्रीतीच्या जीवनावरही खोलवर परिणाम झाला. ती लवकरच मॅच्युअर झाली.

सर्वाधिक शिकलेल्या अभिनेत्रींपैकी एक
प्रीतीने तिचे शालेय शिक्षण शिमला येथील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमध्ये केले. यानंतर तिने सेंट बेडे कॉलेज शिमला येथून पुढील शिक्षण घेतले. प्रीती ही बॉलिवूडमधील सर्वाधिक शिकलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंग्रजी ऑनर्समध्ये ग्रॅज्युएशन आणि क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

1996 मध्ये एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रीतीची भेट एका दिग्दर्शकासोबत झाली, त्याने तिला चॉकलेट कमर्शियलमध्ये काम करण्याची ऑफर दिली. यानंतर प्रीतीने बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले. 1997 मध्ये एका ऑडिशन दरम्यान शेखर कपूर यांनी प्रीतीला पाहिले आणि तिला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.

शेखर कपूर प्रीती आणि हृतिक रोशनसह तारा रम पम बनवणार होते, पण काही कारणास्तव चित्रपट बनू शकला नाही. या नंतर प्रीतीने कुंदन शाह यांच्या 'क्या कहना' चित्रपटात काम केले पण हा चित्रपट दोन वर्षे अडकला. यादरम्यान, प्रीती दिल से आणि सोल्जर यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली आणि तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली.

2016 मध्ये लग्न

2016 च्या सुरुवातीस अभिनेत्री प्रीती झिंटाने अमेरिकेन वंशाच्या जीन गुडइनफशी लग्न केले. जीन हा प्रीतीपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. 29 फेब्रुवारीला या जोडीने लॉस एंजेलिसमधील एका खासगी कार्यक्रमात लग्न केले. लग्नाच्या जवळपास 6 महिन्यांनंतर प्रीती आणि जीनच्या लग्नाचे फोटो समोर आले होते.