आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा ‘फ्लाइंग सिख’:मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ, शाहरुख, अक्षय, प्रियांकाने व्यक्त केला शोक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिल्खा सिंग कोरोनामुक्त झाले हाेते, शुक्रवारी रात्री 11:24 वाजता निधन

भारताचे महान धावपटू आणि ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री 11:24 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, आणि त्यांनी कोरोनावर यशस्वी मातही केली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना 3 जूनला पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. देशातील विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा शेवटचा संवाद असेल, असे वाटले नव्हते.’

अमिताभ-शाहरुख आणि अक्षयसह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन, सोनू सूद, शाहरुख खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, तापसी पन्नू, अनुपम खेर, रवीना टंडन, मधुर भंडारकर, अंगद बेदी, जावेद जाफरी, नेहा धुपिया, राहुल बोससह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले,' दु:खात..मिल्खा सिंग यांचे निधन. भारताचा अभिमान... एक उत्तम धावपटू… एक महान व्यक्ती.. त्यांच्यासाठी प्रार्थना.'

अभिनेता शाहरुख खान म्हणाला, 'फ्लाईंग सिख कदाचित यापुढे आपल्यासोबत नसतील मात्र त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा अतुलनीय वारसा कायम आपल्यासोबत असेल. माझ्यासह लाखो लोकांसाठी प्रेरणा.'

अभिनेता अक्षय कुमारने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकेच नाही तर मिल्खा सिंग या चित्रपटात भूमिका न साकारल्याचा खेद वाटत असल्याचे तो म्हणाला आहे. 'मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झाले. त्यांची भूमिका न साकारल्याचे दु:ख मला कायम लक्षात राहिल. तुम्ही स्वर्गात सुवर्ण धाव घ्या.. ‘फ्लाईंग सिख’, ओम शांती.” अशा शब्दांत अक्षयने दु:ख व्यक्त केले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील मिल्खा सिंग यांच्या कुटुबियांचे सांत्वन केले आहे. 'प्रेमाने स्वागत करत तुम्ही आपली पहिली भेट अगदी खास केली होती. आपल्या देशासाठी केलेल्या योगदानामुळे, तुमच्या कर्तृत्वामुळे आणि विनम्रतेमुळे मी प्रेरित झाले आहे. ओम शांती मिल्खा जी,' असे प्रियांका म्हणाली.

अभिनेते अनुपम खेर

अभिनेत्री रवीना टंडन

अभिनेता सोनू सूद

अभिनेता जावेद जाफरी

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेता राहुल बोस

दिग्दर्शक मधुर भंडारकर

अभिनेता रितेश देशमुख

बातम्या आणखी आहेत...