आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रॅमी अवॉर्ड्स 2022:पहिला ग्रॅमी जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाहचे केले अभिनंदन, 'बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम' कॅटेगरीत मिळाला पुरस्कार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम मोदींनी केले फाल्गुनी यांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांचे ग्रॅमी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. 5 एप्रिल रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे मोदींनी फाल्गुनी यांचे कौतुक केले. फाल्गुनी यांनी 'बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम' कॅटेगरीत 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्डवर आपली मोहोर उमटवली आहे. ग्रॅमी पुरस्कारांना संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हटले जाते. 3 एप्रिल रोजी लास वेगास येथील MGM ग्रँड मार्की बॉलरूम येथे 64 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.

पीएम मोदींनी केले फाल्गुनी यांचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, "फाल्गुनी शाह यांचे ग्रॅमीमध्ये 'बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम'चा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. त्यांना भावी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा, @FaluMusic." फाल्गुनी यांचे स्टेज नेम ‘फालू’ आहे. त्यांचा हा पहिलाच ग्रॅमी अवॉर्ड आहे. फाल्गुनी व्यतिरिक्त भारतीय संगीतकार रिकी केज यांनी दुस-यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. 'बेस्ट न्यू एज अल्बम' या श्रेणीत रिकी केज यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

ग्रॅमीमध्ये एकाच श्रेणीसाठी दोनदा नामांकन मिळाले
फाल्गुनी शाह या अमेरिकन भारतीय गायिका आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट मुलांच्या अल्बम प्रकारातील ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फाल्गुनी यांनी ग्रॅमी-आयोजक रेकॉर्डिंग अकादमीचे सोशल मीडियावरून आभार मानले. “आजच्या दिवसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 'ग्रॅमी प्रीमियर सेरेमनी'मध्ये परफॉर्म करणे आणि त्यानंतर 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठी पुरस्कार प्राप्त करणे हा माझा सन्मान आहे. याबद्दल आकादमीचे आभार.' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

फालू या नावाने ओळखल्या जाणा-या फाल्गुनी शाह 2000 मध्ये अमेरिकेला स्थायिक झाल्या. त्यानंतर त्यांनी पती गौरव शाह (बोस्टनचे रहिवासी) यांच्यासोबत 'फ्युजन बँड करिश्मा' साठी टूर केला. 2007 मध्ये त्यांनी अमेरिकेत एक सेल्फ टायटल्ड सोलो अल्बम रिलीज केला.

या अल्बममध्ये त्यांनी दक्षिण पूर्व आशियातील फॉक म्युझिक आणि वेस्टन म्युझिकचे घटक जोडले. त्यांनी संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत अनेक वेळा सादरीकरण केले. ग्रॅमीच्या 'बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम' श्रेणीत दोनदा नामांकन मिळवणा-या त्या एकमेव भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...