आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Prime Minister Narendra Modi Congratulated Lata Mangeshkar On Her Birthday, Says I Consider Myself Fortunate To Have Always Received Her Affection And Blessings

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गानसम्राज्ञीचा वाढदिवस:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले - 'मला नेहमीच त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो'

7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाढदिवसाच्या निमित्ताने लता दीदींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 91 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, 'आदरणीय लता दीदी यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो. लता दीदी या देशभरातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की, मला नेहमीच त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळाला.'

 • अमित शहा यांनी त्रिवेणीचे अद्भूत संगम म्हणून केले वर्णन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लता दीदी यांना शुभेच्छा देताना लिहिले, 'स्वर, संस्कार आणि साधेपणाचा अद्भुत संगम... आदरणीय लता मंगेशकर दीदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संगीताच्या सर्वोच्च परंपरा आणि मूल्ये स्थापित करून, आपण आपल्या गोड आवाजाने जगाला मधुरता दिली आहे. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.'

 • धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ शेअर करुन दिल्या शुभेच्छा

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 'चुपके चुपके' या चित्रपटातील लता दीदींनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये धर्मेंद्र स्वत: देखील दिसत आहेत.

 • कंगना रनोटने कर्मयोगी म्हटले

अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लता दीदी यांचे अभिनंदन केले. कंगनाने लिहिले की, 'महान लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही लोक जे काही करतात ते एकाग्र मनाने आणि पूर्ण लक्ष केंद्रित करुन करतात. त्यामुळे ते केवळ त्यात उत्कृष्ट कामच करत नाहीत, तर त्या कामाचे पर्यायदेखील बनतात. अशा अद्भुत कर्मयोगीला मी सलाम करते.'

 • रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

रितेश देशमुख यानेही लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आदरणीय लता मंगेशकर जी, आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,' असे ट्विट रितेशने केले आहे.

 • सायना नेहवालने शुभेच्छा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...