आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू आणि आकाश-श्लोका अंबानी यांचा मुलगा पृथ्वी 10 डिसेंबर रोजी दोन वर्षांचा झाला. पण काही कारणास्तव 10 डिसेंबर रोजी नव्हे तर 2 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. वंडरलँड थीमवर पृथ्वीची बर्थडे पार्टी ठेवण्यात आली होती. मुंबईतील जिओ गार्डनमध्ये या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकाश आणि श्लोका आपल्या मुलासोबत वाढदिवसाच्या ठिकाणी पोज देताना दिसले.
या पार्टीत अनेक सेलेब्स त्यांच्या मुलांसोबत सहभागी झाले होते. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याच्या दोन्ही मुलांसोबत या बर्थडे पार्टीत दाखल झाला. याशिवाय क्रिकेटर कृणाल पांड्या पत्नी पंखुरी शर्मा आणि मुलगा कवीरसोबत पार्टीत पोहोचला. त्याचा भाऊ हार्दिक पांड्याची पत्नी नताशा देखील त्यांचा मुलगा अगस्त्यसोबत दिसली. दिग्दर्शक अयान मुखर्जीही याठिकाणी स्पॉट झाला. क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही मुलगी समायरासोबत पार्टीत पोहोचली होती.
पाहुयात या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...
आकाश आणि श्लोकाचे 9 मार्च 2019 रोजी शाही थाटात लग्न झाले होते. भारतातील सर्व मोठी मंडळी या लग्नाला उपस्थित होती. शाहरूख खान आणि गौरी, सचिन आणि अंजली तेंडुलकर, युवराज सिंग, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, झहीर-सागरिका, कियारा अडवाणी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. न्यूझीलंडचे क्रिकेटर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान, सुंदर पिचई, रतन टाटा, लक्ष्मी आणि उषा मित्तल यांसारखे नावाजलेले लोकही आकाश आणि श्लोकाला आशीर्वाद द्यायले आले होते. लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी श्लोकाने 10 डिसेंबर 2020 रोजी मुलगा पृथ्वीला जन्म दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.