आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज टीझर आऊट:चित्रपटात अक्षय साकारतोय पृथ्वीराजची भूमिका, मानुषी छिल्लर आणि सोनू सूद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय चित्रपट

यशराज फिल्म्सने अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या पृथ्वीराज या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे. ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारतोय. तर अभिनेता सोनू सूदचीही महत्त्वाची भूमिका चित्रपटात आहे. या चित्रपटाद्वारे माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

21 जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय चित्रपट
टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेले रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेता संजय दत्तची झलकदेखील यात दिसतेय. तर संयोगिताच्या भूमिकेत मानुषी छिल्लरदेखील टीझरमध्ये दिसतेय.

अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त यांच्यासह आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या वर्षात म्हणजेच 21 जानेवारी 2022 ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...