आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज डेटची घोषणा:पृथ्वीराज स्टारर ‘भ्रमम’ या दिवशी होतोय प्रदर्शित, एका पियानो वादकाच्या द्वंद्वावर आधारित आहे चित्रपटाचे कथानक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट एका पियानो वादकाच्या द्वंद्वावर आधारित असून ही व्यक्तिरेखा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने साकारली आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज पृथ्वीराज अभिनीत मल्याळम क्राईम थ्रिलर भ्रमम, 7 ऑक्टोबर 2021 ला भारतात प्रदर्शित होत असल्याची घोषणा केली. 'भ्रमम'मध्ये पृथ्वीराज सुकुमारनसोबत उन्नी मुकुंदन, राशी खन्ना, सुधीर कारामना आणि ममता मोहनदास हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रवि. के. चंद्रनद्वारे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माण एपी इंटरनेशनल आणि वायकॉम-18 स्टूडियोजच्या बॅनरअंतर्गत करण्यात आले आहे.

हा चित्रपट एका पियानो वादकाच्या द्वंद्वावर आधारित असून ही व्यक्तिरेखा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने साकारली आहे, जो अंध असल्याचे नाटक करतो. त्याची संगीत यात्रा सस्पेंस, प्रेरणा, भ्रम आणि नाटक यांच्यासोबत जोडली जाते कारण तो एका मर्डर मिस्ट्री मध्ये अडकत जातो. चित्रपटाची कथा जशी जशी पुढे जाते, ती विचित्र घटना आणि व्यंगातील आरोप-प्रत्यारोपात अडकत जाते, यात संगीतकार जेक्स बिजॉय यांचे देखील योगदान राहिले आहे.

दिग्दर्शक रवि. के. चंद्रन यांनी, अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होत असलेल्या आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरवर म्हणाले की “मला आनंद आहे की आम्ही सिनेमॅटोग्राफीला पुढे नेत चित्रपटाच्या कथेसोबत आमच्या रचनात्मक दृष्टिला प्रत्यक्षात आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. आम्हाला आशा आहे कि एका प्रतिभाशाली टीमसोबत, आम्ही एक असा चित्रपट बनवण्यात यशस्वी झालो आहोत जो प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करेल.”

बातम्या आणखी आहेत...