आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार असून, चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या चित्रपटात खलनायकाची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याचा उलगडा झाला आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाची भूमिका वठवणार आहे.
निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत केली घोषणा
'छोटे मियाँ बडे मियाँ' या चित्रपटात अक्षय कुमार हा ‘बडे मियाँ’ची भूमिका साकारत आहे. तर टायगर श्रॉफ हा ‘छोटे मियाँ’ची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजचे लूक पोस्टर शेअर केले आहे. पृथ्वीराजनेही सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत या चित्रपटाचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
निर्माता जॅकी भगनानी म्हणाला, ''बडे मियाँ छोटे मियाँच्या कलाकारांमध्ये पृथ्वीराज सुकुमारन असणे ही एक उत्कृष्ट बाब आहे. तसेच, त्याची खलनायकाची व्यक्तिरेखा चित्रपटात आणखी रोमांच भरेल."
दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाले, "अत्यंत प्रतिभावान कलाकार पृथ्वीराजसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. या अॅक्शन एंटरटेनरमध्ये असा पॉवरहाऊस परफॉर्मर असणे हा एक अद्भुत अनुभव असेल."
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवन यांचा हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रथमच अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. त्याकाळात गोविंदा सर्वात प्रसिद्ध अभिनेता होता. विनोदी अभिनेता म्हणून त्याची ख्याती होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसर मोठ्या प्रमाणावर हिट ठरला होता. माधुरी दीक्षित देखील यात पाहुणी कलाकार म्हणून दिसली. आता याच सुपरहिट चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितल्यानुसार, ‘आम्ही सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन्स शोधात आहोत. या रिमेकसाठी कोणत्याही प्रकारची कसर प्रोडक्शन हाऊस सोडणार नाही’. पुढील वर्षापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन अभिनेते देखील पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अद्याप चित्रपटात कोणत्या अभिनेत्री झळकणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.