आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Prithviraj Teaser Out: Akshay Kumar Got Trolled Badly As Soon As The Teaser Came, Users Said 'Justice Was Not Done To This Character', 'Looking Like Bala'

पृथ्वीराज टीझर आऊट:टीझर येताच अक्षय कुमार झाला चांगलाच ट्रोल, यूजर्स म्हणाले- 'पात्रावर अन्याय झाला', 'बालासारखा दिसतोय'

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा टीझर सोमवारी निर्मात्यांनी रिलीज केला आहे. चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसत असला तरी चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची निराशा केली आहे. या चित्रपटातील अक्षयचा लूक 'हाऊसफुल 4'मधील त्याच्या लूकशी साधर्म्य साधणारा आहे. अशा परिस्थितीत अक्षयला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने आपली निराशा व्यक्त करताना लिहिले आहे की, 'तो पात्राला न्याय देऊ शकला नाही. भितीदायक लूक. टीव्ही अभिनेत्यांनी पृथ्वीराज चौहानच्या पात्राला अक्षयपेक्षा जास्त चांगला न्याय दिला आहे.'

आणखी एका युजरने लिहिले की, 'रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या प्रकारच्या भूमिकेत अधिक चांगले शोभून दिसतात. तू हाऊसफुल 4 च्या बालासारखा दिसत आहेस.'

एका यूजरने लिहिले की, 'पृथ्वीराज चौहान यांच्या पात्राला योग्य न्याय दिला गेला नाही. बनावट VFX आणि मिशा उत्साह कमी करत आहेत. बालासारख्या विनोदी चित्रपटातच तू चांगला अभिनय करतोस. राजपूत राजाची भूमिका करण्यासाठी तू योग्य व्यक्ती नाहीस. सर्व काही खोटे दिसत आहे.'

बातम्या आणखी आहेत...