आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेते सुनील दत्त यांची आज 15 वी पुण्यतिथी आहे. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची मुलगी प्रिया दत्तने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माझे पप्पा नेहमीच आम्हाला सामान्य ठेवत असत. हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. आई आजारी होती तेव्हादेखील आणि अमेरिकेत तिच्यावर उपचार सुरू होते तेव्हाही पप्पा सलग सहा महिने तिथेच होते. आम्ही सर्व निर्णय सर्वजण मिळून घेत होतो. आम्ही आमच्या मुलांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाही. आईची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करू देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. तथापि, आईचे निधन झाले आणि संजू भैय्याच्या उपचारांवरून घरात वाद व्हायला लागले. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष टॉप टू बॉटम राहिला.
पप्पांनी कायम देशांतील लोकांच्या भल्यासाठी काम केले. अाज कोरोनामुळे आपल्या देशाची जी स्थिती आहे अशावेळी मी त्यांना खूप जास्त मिस करतेय. जर ते आज असते तर बसून राहिले नसते. हे करायचे आहे, असे करायचे आहे. असे म्हणत निश्चितपणे शेकडोे कल्पनांसह उभे राहिले असते.
पप्पांनी आपल्या सिद्धांताशी कधीच तडजोड केली नाही. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत दोनवेळा पदयात्रा केली होती. ज्यावेळी सुवर्ण मंदिरात काही आतंकवादी घुसले होते. त्यावेळी पप्पांचे असे म्हणणे होते की प्रेम आणि शांतीच्या मार्गाने सर्व काही करता येते. म्हणून ते म्हणाले होते की, अापण मुंबई ते अमृतसरपर्यंत एक शांती यात्रा काढू. त्यावेळी माझी परीक्षा सुरू होती. पप्पांना मी म्हणाले, मलाही यायचे आहे. त्यांनी शिक्षकांची परवानगी घेऊन मलाही त्यात सहभागी करून घेतले. दुसरी पदयात्रा नागासाकी ते हिरोशिमासाठी केली होती. माझ्यासाठी माझे वडीलच माझे हिरो आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.