आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगीत सेरेमनी:आई पद्मिनी कोल्हापुरेसह थिरकला प्रियांक, कोर्ट मॅरेजनंतर सुरु झाल्या लग्नाच्या विधी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोघेही मालदीवमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा आणि निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शाजा यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. 4 फेब्रुवारी रोजी दोघे नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांक आणि पद्मिनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात माय-लेकाची ही जोडी ताल धरताना दिसतेय. शाजा आणि प्रियांक आज हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतील.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांक आणि शाजा यांचा साखरपुडा झाला होता. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोघेही मालदीवमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत.

प्रियांकने चित्रपटात येण्यापूर्वी नादिरा बब्बर यांचा ग्रुप, नीरज काबी आणि सलीम आरिफ यांच्याबरोबर थिएटर केले आहे. त्याने रवि किशन यांची मुलगी रीवा सोबत 'सब कुशल मंगल है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

शाजाने 'ऑलवेज कभी कभी' आणि 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. मागील वर्षी शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागले होते.