आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकाने साजरा केला पती निकचा वाढदिवस:व्हिडिओ शेअर करून मित्र आणि कुटुंबियांचे मानले आभार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती निक जोनसने 16 सप्टेंबर रोजी आपला 30वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी प्रियंकाने पती निकसाठी अतिशय सुंदर आणि आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. ज्याचा एक व्हिडिओ प्रियंकाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीचा वाढदिवस मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करताना दिसत आहे. निकचा खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी आणखी बरेच लोक उपस्थित होते. निकने त्याचा वाढदिवस प्रियंकासोबत स्कॉट्सडेल नॅशनल गोल्फ क्लबमध्ये साजरा केला. दिवसा गोल्फ खेळून, रात्री जबरदस्त पार्टी केली.

व्हिडिओ शेअर करताना प्रियंकाने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. निकला शुभेच्छा देताना तिने लिहिले, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आणि हसू राहो.' हा एक असा वीकेंड होता ज्याने माझे मन आनंदाने भरले. माझ्या पतीचा 30 वा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न म्हणून याची सुरुवात झाली पण शेवट त्यापेक्षा मोठा आणि चांगला झाला. आणि त्याच वेळी, तिने निकचा वाढदिवस संस्मरणीय बनवल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार देखील मानले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते प्रियंका आणि निकचे कौतुक करत आहेत. व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...