आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडची होळी:अभिनेत्री प्रियंकाने लंडनमध्ये आपल्या पती, सासू आणि सासरे यांच्यासह साजरी केली होळी, अमिताभला गेल्या वर्षीच्या होळीची आठवण, कंगानाने जैसलमेरहून पाठवल्या शुभेच्छा

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री प्रियंका चोप्राने लंडनमध्ये आपले पती निक जोनस, सासरे पॉल केल्व्हिन आणि सासू डेनिस मिलर जोनस यांच्यासह लंडनमध्ये साजरी केली होळी

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून ती आपल्या आगामी चित्रपट 'मॅट्रिक्स 4' या चित्रपटाची शूटींग करीत आहे. परंतु, होळीच्या पार्श्वभूमीवर तीने शूटींगचे कामकाज थांबवत आपल्या आवडत्या उत्सव लंडनमध्ये साजरा केला आहे. याप्रसंगी पती निक जोनस, सासरे पॉल केल्व्हिन आणि सासू मिलर जोनस यांच्यासह लंडन येथे ऐकमेंकाना रंगवले. आणि या महोत्सवाबद्दल आपल्या चाहत्यांचे अभिनंदन केले.

अभिनेत्री प्रियंकाने या काही उत्सवाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केले आहे. त्यात लिहले की, "होळी हा माझा आवडता सण आहे. आशा आहे की, आपण आपल्या प्रियजनांसोबत घरातच होळी साजरी कराल. होळीच्या सर्वांना शुभेच्छा."

इतर बॉलीवूड सेलेब्सनी दिल्या शुभेच्छा
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक जुना फोटो शेअर करत होळीची आठवण केली आहे. यामध्ये त्यांच्यासोबत जया बच्चन दिसत आहे. सोबतच अमिताभच्या खांद्यावर छोटा अभिषेक बच्चनदेखील दिसत आहे .

अभिनेत्री कंगना रनौत यांनी जैसलमेरमधून दिल्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हे सध्या आपल्या आगामी चित्रपट 'तेजस' या चित्रपटाची राजस्थानच्या जैसलमेर येथे शूटींग करत आहे. दरम्यान तीने जैसलमेर येथून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...