आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:ऑस्करनंतर आता बाफ्टा पुरस्काराचेही सूत्रसंचालन करणार प्रियांका, रामचरणच्या आगामी ‘आरसी 15’ची सलमान खानला ऑफर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा 74 व्या ब्रिटिश अ‍कॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) पुरस्काराचे सूत्रसंचालन करणार आहे. हा समारंभ रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 10 आणि 11 एप्रिल रेाजी होणार आहे. प्रियांकाच्या व्यतिरिक्त फोएब डिनेवोर, ह्यूग ग्रांट, टॉम हिडलस्टन आणि जेम्स मॅकएवोयसारखे कलाकारदेखील सूत्रसंचालन करणार आहेत. विशेष म्हणजे, प्रियांकाचा चित्रपट ‘द व्हाइट टायगर’लादेखील या पुरस्कारात दोन श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. रमीन बहरानी यांना ‘बेस्ट अडॅप्टड स्क्रीनप्ले’साठी नामांकन मिळाले आहे, तर आदर्श गौरवला ‘बेस्ट अॅक्टर इन ए लीडिंग रोल’साठी नामांकन मिळाले आहे.

2. ‘आरसी 15’मध्ये सलमानही झळकणार, राम चरणचा आगामी सिनेमा

राम चरणचा आगामी चित्रपट ‘आरसी 15’ आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर आणि अभिनेते राम चरण यांना यात सलमान खानने खास भूमिका साकारावी अशी इच्छा आहे. चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानला यासाठी विचारणा झाली आहे. ही मुख्य भूमिका नाही मात्र महत्त्वाची भूमिका असणार आहे. सलमानने होकार दिला नाही तर निर्माते या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या कोणत्याही सीनियर स्टारकडे संपर्क करतील. पण सलमानने होकार दिला तर राम चरण, शंकर आणि सलमानचा हा ड्रीम कॉम्बो सिनेमा ठरेल.

3. ‘स्टेट ऑफ सीज 2’ मध्ये मेजरच्या भूमिकेत दिसणार अभिनेता अक्षय खन्ना

‘सीझन स्टेज : 26/11’ नंतर, जी 5 ने आता ‘स्टेट ऑफ सीज : टेम्पल अटॅक’ जाहीर केले आहे. हा सिनेमा गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यावर आधारित आहे. त्यामध्ये निर्मात्यांनी अक्षय खन्नाला स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर म्हणून घेतले आहे. यातील अक्षयचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. त्यामध्ये तो मेजर हनौत सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. याची निर्मिती ड्रीम टीम कॉन्टीलो पिक्चर्स करत आहे. केन घोष दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मात्यांनी अद्याप रिलीज डेटची घोषणा केली नाही.

4. ‘सर्कस’साठी रशियाच्या कलावंतांसोबत शूटिंग करताहेत रणवीर आणि रोहित

रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी सध्या आपल्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यांचा हा चित्रपट ‘कॉमेडी ऑफ एरर्स’वर आधारित असल्याचे बोलले जात आहे. निर्माते मात्र याविषयी काहीच बोलायला तयार नाहीत. मात्र चित्रपटातील काही फोटो व्हायरल झाली आहेत. त्यात चित्रपटाच्या सेटवर काही रशियाचे कलाकार दिसत आहेत. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात रणवीरसोबत दीपिकादेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मादेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

5.राहुल-दिशाला पाहून चाहते चकित!, फोटो व्हायरल

गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारचा हा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला. यात दोघे नवरी-नवरदेवाच्या पोशाखात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले "नई शुरूआत'. त्यांचा हा फोटो पाहून चाहते चकित झाले. त्यांनी लग्न केले असे वाटले. मात्र त्यांनी आपल्या एक म्युझिक अल्बमसाठी हा गेटअप केल्याचे कळाले.

बातम्या आणखी आहेत...