आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांची वेब सिरीज 'सिटाडेल' लवकरच रिलीज होणार आहे. काल रात्री मुंबईत या सिरीजचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला अभिनेत्री रेखा, वरुण धवन, नोरा फतेही, अनुभव सिन्हा, नेहा धुपिया, आदिती राव हैदरी, अनुषा दांडेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
प्रियांका सध्या 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी भारतात आहे. इव्हेंटमध्ये ती ब्लू ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. यावेळी ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तर रिचर्ड काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसला. थाई स्लिट ड्रेसमध्ये प्रियांकाने रिचर्डसोबत पापाराझींना पोज दिली. व्हिडिओमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयनानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्याला पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे खास फोटो शेअर केले आहेत.
अॅक्शन स्पाय थ्रिलर आहे 'सिटाडेल'
रुसो ब्रदर्स दिग्दर्शित 'सिटाडेल' ही एक स्पाय थ्रिलर सिरीज असून त्याची कथा प्रियांका आणि रिचर्ड मॅडन यांच्याभोवती फिरते. या सिरीजमध्ये दोघेही एजंटच्या भूमिकेत आहेत. सिटाडेलमध्ये प्रियंका व्यतिरिक्त लेस्ली मॅनविले, रिचर्ड मॅडन आणि स्टॅनले टुकी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सिरीज 28 एप्रिलपासून Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केली जाईल. त्याचे नवीन भाग दर शुक्रवारी 26 मे पर्यंत विकली रिलीज केले जातील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.