आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकताच अॅक्शन पॅक्ड स्टाप थ्रिलर सिटाडेलता ट्रेलर रिलीज केला आहे. रिलीज होताच या ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा या सिरीजमध्ये लक्ष वेधून घेतेय. अॅक्शन, थरार आणि रोमान्सचा तडका यात आहे. या सिरीजला आतापर्यंत 1.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
या सिरीजमध्ये मेसन केनच्या भूमिकेत रिचर्ड मॅडेन, नादिया सिंगच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा जोनास, बर्नार्ड ऑरलिकच्या भूमिकेत स्टॅन्ली टुकी, डहलिया आर्चरच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, कार्टर स्पेन्सच्या भूमिकेत ओसी इखिले, एब्बी कॉनरॉयच्या भूमिकेत ऍशले कमिंग्स, एंडर्स सिल्जेच्या भूमिकेत रोलँड मोलर आणि डेविक सिल्जे, आणि काओलिन स्प्रिंगल हेंड्रिक्सने कॉनरॉयची भूमिका साकारली आहे.
काय आहे ‘सिटाडेल’ची कहाणी?
सिटाडेल नावाची जागतिक गुप्तचर संस्था म्हणजेच स्पाय एजन्सी आठ वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही एजन्सी लोकांचे संरक्षण करत असे, परंतु मॅन्टीकोरने ती नष्ट केली होती. सिटाडेल नष्ट होताना मेसन केन (रिचर्ड मॅडन) आणि नादिया सिंह (प्रियांका चोप्रा जोनास) हे त्याचे प्रमुख एजंट आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले आणि नवी ओळख निर्माण करून आयुष्य जगू लागले. परंतु एका रात्री बर्नार्ड ऑर्लिक (स्टॅनली टुसी), ज्याने पूर्वी मेसनबरोबर सिटाडेल येथे काम केले होते, तो त्याचा माग काढतो आणि सगळे अचानक बदलते. मॅसनला मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादियाची गरज असते आणि येथून एका नव्या मिशनला सुरुवात होते.
या सिरीजच्या दोन एपिसोडचे प्रीमियर 28 एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल. यानंतर 26 मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.