आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांनंतर प्रियांकाच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह झाले उपस्थित:तिला स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली होती - मिस बार्बाडोसचा दावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल अॅक्ट्रेस प्रियांका चोप्राने 2000 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मात्र आता इतक्या वर्षांनंतर तिच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. माजी मिस बार्बाडोस लीलानी मॅककॉने हिने तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे दावा केला की, मिस वर्ल्ड स्पर्धा त्यावेळी 'फिक्स' होती. संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रियांकाला स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली होती, असा आरोप तिने केला आहे. मिस युएसए ब्युटी पेजेंटमधील एका स्पर्धकाच्या विजेतेपदावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याचदरम्यान सौंदर्य स्पर्धांमध्येही फिक्सिंग होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशात आता लीलानीने मिस वर्ल्ड 2000 स्पर्धेबाबत मौन सोडले आहे.

काय म्हणाली लीलानी?

लीलानी तिच्या व्हिडिओत म्हणाली, 'मिस वर्ल्ड स्पर्धेत मी याच प्रसंगातून गेले होते. मी मिस बार्बाडोस होते आणि ज्या वर्षी स्पर्धेत सहभागी झाले होते त्यावर्षी मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेचे प्रायोजक देखील झी टीव्ही होते जे भारतीय चॅनल आहे. त्यांनी संपूर्ण मिस वर्ल्ड स्पर्धा स्पॉन्सर केली होती. आमच्या सॅशे (खांद्यापासून ते कमरेपर्यंत घालण्यात येणारा पीस ज्यावर 'मिस इंडिया' वैगेरे लिहिले असते) वरही देशाच्या नावाआधी त्या चॅनेलच्या लोगो होता त्यानंतर आमच्या देशाचे नाव लिहिण्यात आले होते.”

व्यवस्थापक इतर मुलींबरोबर भेदभाव करत होते
प्रियांकाला मिळालेल्या स्पेशल ट्रिटमेंटविषयी ती म्हणाली, “ती एकमेव अशी स्पर्धक होती जिने बिकिनी राऊंडच्या वेळी सारोंग परिधान केला होता. तिला तशी परवानगी देण्यात आली होती. याचे कारण सांगण्यात आलेले की, ती स्किनटोन ठीक करण्यासाठी कोणततरी क्रिम लावत होती पण त्याचा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे स्विमसूट राउंडमध्ये तिला सारोंग परिधान करायचा होता. प्रियांका चोप्राला त्या स्पर्धेत सहभागी झालेल्यांपैकी कोणीच पसंत करत नव्हते. प्रियांकाच्या तुलनेत व्यवस्थापकही इतर मुलींबरोबर भेदभाव करत होते.'

प्रियांकाला रुममध्ये जेवण नाश्ता दिला जायचा
लीलानीने पुढे सांगितले, 'सर्व मुली एका ठिकाणी जेवत असत. तर प्रियांका चोप्राला मात्र तिचा नाश्ता आणि जेवण रुममध्ये मिळत असायचे. जिंकण्याआधीच प्रियांका चोप्राचे बिचवर फोटोशूट करण्यात आले होते आणि त्यावेळी इतर मुलींना मात्र वाळूमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभे ठेवण्यात आले होते.'

नेटकरी म्हणाले - लीलानी 22 वर्षे का उशीर केला? लीलानीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंट करत आरोप करण्यासाठी 22 वर्षे का उशीर केला? असा प्रश्न तिला विचारत आहेत.

2000 च्या मिस वर्ल्ड विजयानंतर, प्रियांकाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच ती बी-टाउनच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक बनली. यानंतर तिने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. आता प्रियांका निक आणि तिची मुलगी मालतीसोबत लॉस एंजिलिसमध्ये राहते.

बातम्या आणखी आहेत...