आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने लाडकी लेक मालती मेरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मालतीचा आवाज ऐकू येत आहे. प्रियांकाच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालती पाळण्यात बसलेली दिसत आहे. तिचा चेहरा नसला तरी हसताना आणि रडतानाचा तिचा आवाज ऐकू येत आहे. प्रियांकाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "आम्हाला सेंट्रल पार्कमध्ये जायला आवडते". मालतीच्या या व्हिडिओमध्ये प्रियांकाचादेखील हसतानाचा आवाज येत आहे.
सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया
प्रियांकाच्या लेकीचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना इलियाना डिक्रूजने लिहिले, 'माय हार्ट'. तर काजल अग्रवाल आणि दीया मिर्झा यांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट केले.
आईसोबत खेळणी घ्यायला पोहोचली होती मालती
यापूर्वी प्रियांकाने मालतीसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोत मालती आपल्या आईसोबत खेळणीच्या दुकानात पोहोचली होती. प्रियांकाने ही पोस्ट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'सॅटर्डे इन राइट.'
एका फोटोत प्रियांका शॉपिंगदरम्यान मालतीसोबत दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत चिमुकली फूड कोर्टला पकडून उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.
मागील महिन्यात मुलीसोबत भारतात आली होती प्रियांका
प्रियांका चोप्रा गेल्या महिन्यात मुलगी मालतीसोबत भारतात आली होती. मालती जन्मानंतर पहिल्यांदाच तिच्या आजोळी आली होती. यावेळी प्रियांकाने लेकीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'सिटाडेल' या हॉलिवूड वेब सिरीजमधून प्रियांका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता ती बऱ्याच काळानंतर बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात ती झळकणार आहे. यात ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.