आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला फेअरनेस क्रिमची जाहिरात केल्याचा पश्चाताप होतोय. याविषयी प्रियांकाने तिच्या ‘अनफिनिश’ या पुस्तकात भाष्य केले आहे. अलीकडेच प्रियांकाने या पुस्तकाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली असून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिचे हे पुस्तक यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलीज होत आहे.
प्रियांकाच्या अनफिनिश्ड गोष्टी
आपल्या पुस्तकात प्रियांकाने एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील निरिक्षणे, खासगी गोष्टी सांगितल्या आहेत. एकेकाळी फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींना पाठिंबा
दिल्याचा आता पश्चाताप होत असल्याची कबुली तिने यात दिली आहे.
प्रियांकाला वाटायचे सावळा रंग सुंदर नसतो
प्रियांका म्हणाली, 'दक्षिण आशियातील देशात फेअरनेस क्रीम वापरणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. हे एवढे मोठे क्षेत्र आहे की तिथे जवळपास प्रत्येक व्यक्ती फेअरनेस क्रीमचा वापर करतांना दिसते. खरे तर या जाहिरातींमध्ये गोरा रंग असणाऱ्या अभिनेत्रींना प्राधान्य दिले जाते हे फार चुकीचे आहे. माझ्यासाठी तर हे खूपच त्रासदायक होते. लहान असताना सावळ्या रंगामुळे मी सुंदर दिसत नाही असे मला वाटायचे त्यामुळे मी कायम टॅल्कम पावडर, क्रीम लावायचे ,' असे प्रियांकाने सांगितले.
प्रियांकाला का बदलायचा होता रंग?
यापूर्वी 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देखील प्रियांकाने वर्णभेदावर भाष्य केले होते. बरखा दत्तसोबत बोलताना प्रियांका म्हणाली होती, 'जेव्हा मी 13 वर्षांची होते तेव्हा कायम मला माझा रंग बदलायला हवा असे वाटायचे. माझे सर्व बहीणभावंड गोरे होते. माझ्या कुटुंबात मला काळी काळी म्हणून चिडवले जायचे.' पुढे ती म्हणाली, त्यावेळी मला या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटायचे. किंबहुना त्याची सल आजही मला जाणवत होती. त्यामुळेच मी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणं बंद केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.