आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकेच नाही तर हॉलिवूडमध्येही ती आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवत आहे. तसेच ती एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. यापूर्वीच प्रियांकाने सोना नावाचे रेस्तराँ सुरु केले आहे. आता प्रियांका चोप्राने तिची नवीन होमवेअर लाईन 'सोना होम' लाँच केली आहे. डिनर सेट, क्रॉकरीसारख्या वस्तू या होमवेअरमधून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंना भारतीय टच मिळावा, परदेशात राहूनही लोकांना आपल्या घराची, आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी, यासाठी प्रत्येक वस्तूंवर प्रियांकाने पारंपरिक भारतीय डिझाईनची निवड केली आहे.
आपल्या नवीन व्यवसायासह यूएसमध्ये स्थायिक झाल्याबद्दल प्रियांका आता व्यक्त झाली आहे. प्रियांका म्हणाली की, सोना होमच्या माध्यमातून तिला भारतीय वारसा अमेरिकेतील घरांचा भाग बनवायचा आहे. तसेच, काम आणि निक जोनाससोबत लग्नानंतर अमेरिकेत दुसरे घर आणि कुटुंब तयार करणे तिच्यासाठी किती आव्हानात्मक होते, हेदेखील तिने सांगितले आहे.
'सोना होम' भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे
प्रियांकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणाली, "सोना होमची ओळख करुन देताना मला अभिमान वाटत आहे. भारतातून येऊन अमेरिकेला माझे दुसरे घर बनवणे आव्हानात्मक होते. पण माझ्या प्रवासाने मला अशा ठिकाणी नेले जिथे मला दुसरे कुटुंब आणि मित्र मिळाले . तसेच सोना होमचे एकापेक्षा एक व्हायब्रंट डिझाइन माझा सुंदर भारत प्रतिबिंबित करतात. आम्हाला आशा आहे की सोना होम तुम्हाला त्या सुंदर वेळेत परत घेऊन जाईल."
प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स
प्रियांकाने अलीकडेच तिची आगामी वेब सिरिज 'सिटाडेल'चे शूटिंग पूर्ण केले. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरिज स्ट्रीम होणार आहे. तिच्याकडे 'एंडिंग थिंग्ज' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' असे प्रोजेक्ट आहेत. प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.