आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियर सोहळा:प्रियांका चोप्राच्या 'लव्ह अगेन' चित्रपटाचा न्यूयॉर्कमध्ये प्रीमियर, को-स्टार सॅम ह्यूगनने अभिनेत्रीला केले किस

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच हॉलिवूड स्टार सॅम ह्यूगनसोबत तिच्या आगामी 'लव्ह अगेन' चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. 'लव्ह अगेन'चा प्रीमियर शो न्यूयॉर्कमध्ये झाला. चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान प्रियांकाचा सहकलाकार सॅम ह्यूगन प्रियांकाला किस करताना दिसला. यावेळी चित्रपटाच्या टीम मेंबर्सशिवाय प्रियांकाचा पती निक जोनासही उपस्थित होता. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होतोय.

प्रियांका डेनिम गाऊनमध्ये दिसली
या चित्रपटाच्या प्रीमियर शोला प्रियांका निळ्या रंगाच्या डेनिम गाऊनमध्ये दिसली. तिने तिचे केस मोकळे सोडेल. गळ्यात एक छोटा नेकलेस आणि कानात छोटे इयरिंग्स घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला. तर निक ग्रे रंगाच्या सूटमध्ये दिसला.

प्रियांकाचा ड्रेस सांभाळताना दिसला निक
यावेळी निक प्रियांकाचा हा डिझायनर ड्रेस सांभाळताना दिसला. व्हिडिओवर कमेंट करताना युजरने लिहिले - 'प्रियांकाने डेनिमपासून तयार झालेला प्रिसेंस ड्रेस ड्रेस घातला आहे.' तर एक यूजर म्हणाला की, प्रियांकाने सोशल डिस्टन्सिंगसाठी हा ड्रेस घातल्याचे दिसते.'