आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:प्रियांकाने लग्नात खर्च केले होते कोट्यवधी रुपये, हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने झाला होता लग्नसोहळा, बघा लग्नाचा अल्बम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जोधपूर येथील उम्मैद भवनमध्ये या दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी आपल्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या निकसोबत सप्तपदी घेतल्या होत्या. जोधपूर येथील उम्मैद भवनमध्ये या दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता.

या लग्नासाठी प्रियांकाने तब्बल चार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता.

लग्नावर खर्च केले होते 4 कोटी रुपये
प्रियांकाने आपला लग्नसोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक सोडली नव्हती. तिने आपल्या लग्नाच्या पाच वर्षांआधीच उम्मैद भवन येथेच लग्न करणार असल्याचे ठरवले होते.

झाले असे की, प्रियांका 28 नोव्हेंबर 2013 रोजी झारखंडचे बिझनेसमन रमेश प्रसाद साव यांचा मुलगा रोहितच्या लग्नाच्या निमित्ताने उम्मैद भवन येथे आली होती. त्यावेळी ती या पॅलेसच्या प्रेमात पडली आणि स्वतःचे लग्न याच ठिकाणी करण्याचा तिने निर्णय घेतला.

प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत उम्मैद पॅलेस बुक करण्यात आले होते. याकाळात हे पॅलेस टूरिस्ट्ससाठी बंद करण्यात आले होते

संपुर्ण हॉटेलचा 1 दिवसाचा खर्च जवळपास 64.40 लाख रुपये होता. प्रियांकाने 5 दिवसांसाठी हॉटेल बुक केले होते. यासाठी जवळपास तिने 3.2 कोटी खर्च केले होते. यामध्ये केटरिंगचा खर्च जोडल्यास संपुर्ण लग्नात 4 कोटी रुपये इतका झाला होता.

प्रियांकाने लग्नात लाल रंगाचा लहेंगा परिधान केला होता तर निक गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसला होता.

प्रियांकासाठी डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांनी हा लहेंगा डिझाइन केला होता. तर ख्रिश्चन लग्नात तिने Ralph Lauren चा आउटफिट परिधान केला होता.

पाहूण्यांना देण्यात आले होते रिटर्न गिफ्ट
प्रियांकाने लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट दिले होते. तिने मुंबईच्या एका ज्वेलरकडून चांदीचे नाणे डिझाइन करुन घेतले होते.

या नाण्याच्या एकाबाजूने निक आणि प्रियांकाच्या नावाचे पहिले अक्षर होते. म्हणजे एकाबाजून NP आणि दुस-या बाजूने गणेश-लक्ष्मीचा फोटो होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser