आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यातील 'डार्क फेज':प्लास्टिक सर्जरीमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री प्रियांका चोप्रा, 3 चित्रपटांतून काढून टाकण्यात आले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सिरीजमुळे चर्चेत आहे. नुकतीच तिची ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्लास्टिक सर्जरीनंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचा धक्कादायक खुलासा प्रियांकाने केला आहे.

मिस वर्ल्ड बनल्यानंतर काही काळाने प्रियांकाच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मिस वर्ल्ड बनल्यानंतर काही काळाने प्रियांकाच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

माझे बॉलिवूड करिअर पणाला लागले होते
द हॉवर्ड स्टर्न या कार्यक्रमात प्रियांका नुकतीच सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "प्लास्टिक सर्जरी केल्यावर माझे जगणे कठीण झाले होते. नाकावर प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर मला तीन चित्रपटांची ऑफर नाकारण्यात आली. हा माझ्या आयुष्यातील ‘डार्क फेज’ होता, कारण सर्जरी केल्यावर माझा चेहरा पूर्वीपेक्षा एकदम वेगळा दिसू लागला होता, यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि माझे करिअर पणाला लागले."

सर्जरी बिघडली होती, नाकाचा आकार बदलला होता

झाले असे की, मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर प्रियांकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की, तिच्या नाकात पॉलीप (टिश्यू ग्रोथ) आहे आणि ती काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. प्रियांकाची शस्त्रक्रिया चुकीची झाली आणि तिच्या नाकाचा लूक पूर्णपणे बदलला. आपली अभिनय कारकीर्द सुरू होण्याआधीच संपेल अशी भीती तिला वाटू लागली होती.

प्रियंका तिचे वडील अशोक चोप्रा यांच्या खूप जवळ होती, त्यांचे 10 जून 2013 रोजी निधन झाले.
प्रियंका तिचे वडील अशोक चोप्रा यांच्या खूप जवळ होती, त्यांचे 10 जून 2013 रोजी निधन झाले.

वडिलांनी दिली खंबीर साथ
प्रियांकाने सांगितल्यानुसार, तिचे दिवंगत वडील अशोक चोप्रा यांनी तिला पुन्हा सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. वाईट काळात त्यांनीच खंबीर साथ दिल्याचे तिने सांगितले. प्रियांका पुढे म्हणाली, "या वेळी माझ्या वडिलांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे मी त्या कठीण प्रसंगातून सावरले, वडिलांनी मला पुन्हा एकदा जगण्यासाठी हिंमत दिली. त्यांनी माझा हात पकडून माझ्यात असलेल्या आत्मविश्वासाची जाणीव मला करून दिली. नाही तर आज माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते."

प्रियांकाने 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत प्रीती झिंटा आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते.
प्रियांकाने 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत प्रीती झिंटा आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते.

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे केले कौतुक
प्रियांकाने 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे कौतुक देखील केले. तिने सांगितले, "सर्जरीनंतर मला तीन चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, परंतु 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा असे एकमेव होते की, त्यांनी मला त्यांच्या प्रोजेक्टमधून बाहेर केले नाही." अनिल यांनी प्रियांकाला 'द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली होती. हा प्रियांकाचा पहिला चित्रपट होता.