आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियांकाची नवी सुरुवात:अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये सुरु केले भारतीय रेस्तराँ, नाव ठेवले 'सोना'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या रेस्तराँमध्ये भारतीय पदार्थांची चव लोकांना चाखता येणार आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे नवीन रेस्तराँ सुरु केले आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोना असे तिच्या या नवीन रेस्तराँचे नाव असून या महिन्याच्या शेवटीपर्यंत ते सुरु होईल, असे प्रियांकाने सांगितले आहे. प्रियंकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रेस्तराँचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये प्रियांका आणि तिचा पती निक जोनास पूजा करताना दिसत आहेत. या रेस्तराँमध्ये भारतीय पदार्थांची चव लोकांना चाखता येणार आहे.

प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'सोनाला तुमच्यासमोर सादर करण्यास मी खूप उत्सुक आहे. न्यूयॉर्कमध्ये आम्ही सोना रेस्तराँ सुरू केले आहे. मी लहानपणापासून ज्या भारतीय पदार्थांची चव चाखत मोठे झाले आहे, ती चव येथे लोकांना मिळणार आहे. शेफ हरी नायक हे माझ्या या रेस्तराँचे किचन सांभाळणार आहेत. हरी नायक हे अतिशय हुशार असून त्यांनी चविष्ठ आणि इनोव्हेटिव्ह मेन्यू तयार केला आहे. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला आहे,' असे प्रियांका म्हणाली आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होईल रेस्तराँ
प्रियांकाने पुढे लिहिले, 'या महिन्याच्या अखेरपर्यंत रेस्तराँ लोकांसाठी सुरु होईल. मी तुम्हा सर्वांना येथे भेटण्यासाठी आतूर आहे. माझे मित्र मनीष गोयल आणि डेविड रेबिन यांच्या मार्गदर्शनाशिवाय माझा हा प्रयत्न यशस्वी झाला नसता. माझ्या व्हिजनवर काम करण्यासाठी माझी संपूर्ण टीम आणि डिझायनर मेलिसा बॉवर्स यांचे आभार,' अशा आशयाची पोस्ट प्रियांकाने शेअर केली आहे.

'मॅट्रिक्स 4' मध्ये झळकणार प्रियांका
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, ती लवकरच हॉलिवूडच्या दोन चित्रपटांत झळकणार आहे. 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'मॅट्रिक्स 4' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. 'टेक्स्ट फॉर यू' मध्ये प्रियांकाशिवाय सॅम ह्यूगन आणि सेलिन डायन मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, 'मॅट्रिक्स 4' मध्ये प्रियांका मुख्य भूमिकेत असून तिच्यासह कियानू रीव्स, कॅरी-एन्नी मॉस आणि नील पॅट्रिक हॅरिस हे कलाकार दिसणार आहेत.

या व्यवसायाशी संबंधित आहे प्रियांका
प्रियांकाच्या अन्य व्यवसायाबद्दल सांगायचे म्हणजे ती अभिनयाव्यतिरिक्त चित्रपटांची निर्मिती देखील करते. 'पर्पल पेबल्स पिक्चर्स' नावाचे प्रियांकाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तिने 'द स्काई इज पिंक', 'द व्हाइट टायगर', 'व्हेंटिलेटर', 'सर्वन', 'पाहूना', 'फायरबँड', 'पानी' यासारखे अनेक उत्तम चित्रपट तयार केले आहेत. प्रॉडक्शन हाऊसशिवाय प्रियांकाने काही दिवसांपूर्वीच तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला. याशिवाय तिचे 'अनफिनिश्ड' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...