आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकप्रिय अमेरिकन रॅपर आणि अभिनेता अर्ल सिमन्स यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सिमन्सला हृदयविकाराचा झटका आला. न्यूयॉर्कच्या केविट प्लेन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिमन्स यांना DMX आणि डार्क मॅन एक्स या नावानेही ओळखले जात होते.
डीएमएक्स यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहते आपल्या लाडक्या रॅपरला श्रद्धांजली वाहत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत डीएमएक्सच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
DMX च्या निधनाने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे
प्रियांका चोप्राने एक पोस्ट शेअर करत लिहिले, "ते माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक होते. आणि नंतर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे माझे स्वप्न झाले होते. डीएमएक्सच्या निधनाने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, RIP DMX," अशा शब्दांत प्रियांकाने डीएमएक्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रणवीर सिंगनेदेखील आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर DMX यांचा एक फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रणवीरने हार्ट ब्रेक इमोजी आणि DMX यांचे 'लेट मी फ्लाय' हे गाणेही शेअर केले आहे.
DMX यांना अनेक वर्षांपासून होते ड्रग्सचे व्यसन
DMX गेली अनेक वर्षे ड्रग्सच्या व्यसनात अडकले होते. व्यसनातून मुक्त होण्यासाठी 2019 मध्ये ते एका व्यसनमुक्ती केंद्रातही गेले होते. ज्यामुळे त्यांना त्याचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. DMX यांनी 1998 मध्ये रॅप संगीताद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गाण्यांच्या लोकप्रियता सांगणा-या 'बिलबोर्ड' 200 चार्टवर त्यांचा पहिला स्टुडिओ अल्बम 'इट्स डार्क अँड हेल इज हॉट'ने अव्वल स्थान प्राप्त केले होते. त्यांनी 'रफ राइडर्स अँथम', 'पार्टी अप', 'गेट अॅट मी डॉग' आणि 'स्टॉप बीइंग ग्रेडी' अशी अनेक लोकप्रिय गाणी दिली. त्यांचे 'द ग्रेट डिप्रेशन' आणि 'ग्रँड चॅम्प' अल्बमसुद्धा लोकांना भावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.