आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:प्रियांकाने ऋषी कपूर यांच्या आठवणीत लिहिले - पहिल्या आघाडीच्या भूमिकेपासूनच त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्यांचे जाणे सिनेमाच्या एका युगाचा अंत 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांका चोप्राने ऋषी कपूर यांच्यासोबत 'अग्निपथ' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ अभिनेत्री प्रियांका चोप्राने टाइम मॅगझिनसाठी एक लेख लिहिला आहे. त्यात तिने ऋषी कपूर यांच्या प्रभावी चित्रपट कारकिर्दीविषयी सांगितले आहे. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, 30 एप्रिल रोजी या जगाचा कायमचा निरोप घेणारे ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये रोमान्सचे नवे युग घेऊन आले होते.

प्रियांकाने लिहिले, "1973 मध्ये आलेल्या 'बॉबी' या चित्रपटातील पहिल्याच लिडिंग रोलमधून त्यांनी रोमान्सच्या नव्या युगाची सुरुवात करुन सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या जोशने त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठेवले. ते खोडकर, बंडखोर आणि कट्टर होते. त्यांनी प्रेम करणे सोपे केले होते. त्यांचा करिष्मा त्याच्या विलक्षण हसण्यात होता, जो त्यांच्या चाहत्यांना गुडघ्यावर टेकण्यास भाग पाडायचा."

'अग्निपथ' चित्रपटात एकत्र काम करण्याचे भाग्य लाभले

पुढे प्रियांका लिहिते, "त्यांना नाचताना बघून आम्हीही थिरकायला लागायचो. नंतर त्यांनी आपल्या पात्रांमध्ये प्रयोग सुरू केले. पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळ्या भूमिका त्यांनी नंतर साकारल्या. मला 'अग्निपथ' या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य लाभले होते. यात त्यांनी एक क्रूर व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेमापेक्षा द्वेषाला उद्युक्त करते."

ऋषी कपूर यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका युगाचा शेवट झाला

प्रियांकाने लिहिले, "ऋषी कपूर यांच्या जाण्याने हिंदी सिनेमाच्या एका युगाचा अंत झाला आहे. परंतु चित्रपट जगातील त्यांचे योगदान नेहमीच येणा-या पिढ्यांना प्रेरणा देईल. आपल्या सुंदर कुटुंबासाठी - नीतू मॅम, रिद्धिमा आणि रणबीर, जग तुमच्यासोबत आहे."

प्रियांकाने लिहिले की,  मी आभारी आहे की मला ऋषी यांच्या व्यक्तिमत्त्त्वासोबतच त्यांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांचे हसणे आणि जीवनच्या उत्साहाला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याची संधी मिळाली. हेच कारण आहे की, ते माझ्या कायम आठवणीत राहतील. 

बातम्या आणखी आहेत...