आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PC ने सासरचे आडनाव का वगळले!:प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवरुन 'जोनास' आडनाव काढून टाकले, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान एका कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांकाने तिचे आडनाव काढून चाहत्यांना गोंधळात टाकले

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून तिच्या नावातून 'चोप्रा' आणि 'जोनास' ही आडनावे काढून टाकली आहेत. तर ट्विटर अकाउंटवर आता केवळ प्रियांका एवढेच नाव ठेवले आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री अचानक प्रियांकाच्या सोशल मीडिया हॅण्डलवर हा बदल दिसून आला. तिच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्यात आणि पती निक यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या अफवा उठल्या आहेत. मात्र असे असताना प्रियांकाने केलेल्या एका कमेंटने सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला असे म्हणता येऊ शकते.

ट्विटर अकाउंटवर आता केवळ प्रियांका एवढेच नाव दिसत आहे.
ट्विटर अकाउंटवर आता केवळ प्रियांका एवढेच नाव दिसत आहे.

मला तुझ्या कुशीत मरायचे आहे: प्रियांका
निक जोनासने अलीकडेच जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करताना प्रियांकाने लिहिले की, "Damn! मला तुझ्या कुशीत मरायचे आहे." प्रियांकाने निकच्या बॉडीवर फिदा होऊन ही कमेंट केली आहे. प्रियांकाच्या या कमेंटमुळे ते दोघेही विभक्त होणार नसल्याचे कळत आहे.

व्हिडिओत निक जोनास जिममध्ये डंबल्स उचलताना आणि बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निकने लिहिले, 'मंडे मोटिवेशन, लेट्स गेट इट!'

प्रियांकाच्या आईने घटस्फोटाच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया
प्रियांकाने अचानक जोनास हे आडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी तिच्या आईने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मधू चोप्रा यांनी प्रियांका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असे मधून चोप्रा म्हणाल्या आहेत.

प्रियांकाने तिचे आडनाव काढून चाहत्यांना गोंधळात टाकले
प्रियांका आणि निकच्या लग्नाला 1 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. पण, तत्पूर्वी प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून 'जोनास' हे आडनाव काढून चाहत्यांना गोंधळात टाकले होते. यानंतर निक आणि प्रियांका विभक्त होणार असल्याच्या बातम्यांनीही जोर धरला होता.

निकसोबत लग्नानंतर प्रियांकाने नावापुढे जोडले होते जोनास आडनाव
लग्नानंतर प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील नाव बदलून प्रियांका चोप्रा जोनास केले होते. प्रियांकाने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोवरून 'चोप्रा' आणि 'जोनास' हे आडनाव का काढून टाकले हा प्रश्न निर्माण झाला आहे. चाहते आता प्रियांकाच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

मॅट्रिक्समध्ये दिसणार आहे प्रियांका
प्रियांकाच्या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टची रिलीज डेट सोमवारीच जाहीर करण्यात आली आहे. मॅट्रिक्स सीरिजचा नवीन चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय प्रियांकाचे काही हॉलिवूड प्रोजेक्ट्सही आहेत.

सामंथा आणि मलायका यांनी घटस्फोटापूर्वी वगळले होते आडनाव
अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथानेही तिच्या नावापुढे असलेले अक्किनेनी आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर नागा चैतन्यपासून घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला होता. मलायका अरोरा खानने तिचा पती अरबाज खानपासून घटस्फोट घेण्यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून खान आडनाव काढले होते. असे अनेक बी-टाउन सेलेब्स आहेत ज्यांनी रिलेशनशिपमध्ये वेगळे होण्यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आडनाव आणि जोडीदारासोबतचे फोटो काढून टाकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...