आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुधवारी संध्याकाळी लंडनमधील एका सलूनमध्ये पोचली होती. यावेळी तिची आई मधु चोप्रा आणि डॉग डायना तिच्यासोबत हजर होत्या. प्रियांकाच्या या कृत्यामुळे यूकेमध्ये असलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन झाले. विशेष म्हणजे यूकेमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रियांकाचे सलूनमध्ये जाणे तिच्यासाठी अडचणीचे ठरले.
पोलिसांनी दंड आकारला नाही
यूकेचे न्यूज पोर्टल मेट्रोच्या वृत्तानुसार, प्रियांका संध्याकाळी 4.55 वाजता सलूनमध्ये पोहोचली. लॉकडाउनमुळे पर्सनल केअर सर्व्हिसेस बंद आहेत, ज्यात सलून आणि स्पाचा समावेश आहे. प्रियांकाने हेअर ड्रेसरचे नियम तोडल्याची बाब पोलिसांपर्यंत पोहोचली आणि 5:40 च्या सुमारास पोलिस घटनास्थली दाखल झाले. यासाठी प्रियांकाला दंड ठोठावला जाऊ शकला असता. पण पोलिसांनी फक्त इशारा देऊन त्यांना सोडले. विशेष म्हणजे, प्रियांकासोबत सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोस वुड देखील यावेळी हजर होता.
टीम परत येण्याच्या प्रयत्नात
प्रियांका पती निक जोनाससह लंडनमध्ये असल्याची माहिती आहे. 'टॅक्स्ट फॉर यू' या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनमध्ये गेली होती. या महिन्याच्या शेवटी शूटिंग पूर्ण होणार होते. मात्र लॉकडाउनमुळे सर्व येथेच अडकले आहेत. मात्र प्रॉडक्शन टीमचे शक्य तितक्या लवकर अमेरिकेत परत येण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.