आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. तिचे हे पुस्तक 9 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. या पुस्तकात प्रियांकाने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने एका बड्या निर्माता-दिग्दर्शकाचा उल्लेख केला आहे, ज्याला ती करिअरची सुरुवातीला भेटली होती. त्या दिग्दर्शकाने प्रियांकाला ब्रेस्टसह शरीराच्या तीन अंगाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
'दिग्दर्शकाने मागे वळून बघायला सांगितले आणि टक लावून बघत राहिला'
प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, 2000 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळाल्यानंतर जेव्हा ती अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार होती तेव्हा ही घटना घडली होती. अभिनेत्रीने लिहिले की, "काही मिनिटांच्या भेटीदरम्यान त्या दिग्दर्शक / निर्मात्याने मला उभे राहण्यास सांगितले. मी त्याने सांगितले तसे केले. तो बराच वेळ माझ्याकडे टक लावू बघत राहिला आणि नंतर त्याने मला माझ्या ब्रेस्ट, जबडा बटची सर्जरी करायला हवी, असे म्हटले."
'जर मला अभिनेत्री व्हायचे असेल तर मला माझ्या शरीरात बदल करायला हवा. लॉस एंजेलिसमध्ये तो एका चांगल्या डॉक्टराला ओळखतो आणि तो मला तिथे पाठवू शकतो, असे त्या दिग्दर्शकाने मला म्हटले होते,' असे प्रियांकाने सांगितले.
त्यावेळी जो माझा मॅनेजर होता, त्याने यासाठी त्याला होकार दिला होता. नंतर मी त्या मॅनेजरपासून वेगळे झाले, असेही प्रियांकाने सांगितले आहे.
यापूर्वी प्रियांका याबद्दल का बोलली नाही?
यापूर्वी प्रियांका याबद्दल कधीच का बोलली नाही? याचे कारण प्रियांकाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार ती मनोरंजन क्षेत्रात काम करते आणि इथे मजबूत असणे आवश्यक आहे. एखादा कलाकार कमकुवत झाला तर लोक त्याला मान देत नाही. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत ती आपले काम करत राहिली, असे तिने सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.